Pitru Paksha 2024 : हिंदू धर्मात व्रत आणि सणाला अतिशय महत्त्व आहे. प्रत्येक सणामागे विशेष कारण आणि पूजा विधी असतात. यंदा गणेश विसर्जन म्हणजे अनंत चतुर्दशी, भाद्रपद पौर्णिमा व्रत आणि पितृ पक्षाची सुरुवात याबद्दल संभ्रम निर्माण झालाय. संभ्रमाचे कारण म्हणजे एकाच दिवशी व्रत आणि सण अशा दोन तारखा आल्यामुळे ज्योतिषी पंडित शशी शेखर त्रिपाठी यांच्याकडून जाणून घ्या कोणते व्रत कधी करायचं आहे? गणेश विसर्जन कधी करावे आणि पितृ पक्ष किंवा श्राद्ध कधी सुरू होणार आहे? यासोबत पितृ पक्षाच्या सर्व तिथीही जाणून घ्या.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन करण्यात येतं. चतुर्थी ते चतुर्दशी असे 10 दिवस गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे. आता बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. 16 सप्टेंबर दुपारी 3:10 वाजेपासून चतुर्दशी तिथी सुरु होत आहे. जी दुसऱ्या दिवशी 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11:44 पर्यंत असणार आहे. त्यामुळे 17 रोजी सकाळी 6 ते 11:44 पर्यंत गणेशाची उत्तरपूजा करुन बाप्पाला निरोप द्यावा.
अनंत चतुर्दशी आणि पौर्णिमेचा उपवास हा 17 सप्टेंबरला ठेवण्यात येणार आहे. चतुर्दशी तिथी 17 सप्टेंबरला सूर्योदयाच्या वेळी असणार आहे. त्यामुळे अनंत चतुर्दशी व्रत 17 तारखेलाच पाळावे लागणार आहे. जे पौर्णिमेचे व्रत ठेवतात, त्यांनी 17 सप्टेंबरलाच उपवास करावा. आता अनंत चतुर्दशीच्या दिवशी पौर्णिमा कशी आली याबद्दल अनेकांना संभ्रम आहे. खरंतर सूर्योदयाच्या वेळी चतुर्दशी तिथी आहे आणि पौर्णिमा चंद्रोदयाच्या वेळी असतो, म्हणून पौर्णमासी व्रत या दिवशी साजरा करण्यात येतं.
श्राद्ध भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू होते, जे अश्विन अमावस्येपर्यंत असणार आहे. श्राद्धाच्या दिवसाबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. संभ्रमाचे कारण असे आहे की सामान्यतः पंचांगानुसार महिना प्रतिपदेपासून म्हणजेच पहिल्या तिथीपासून सुरू होतो.पण पौर्णिमा श्राद्ध भाद्रपदाच्या पौर्णिमेच्या दिवशी सुरु होतं. त्यामुळे पौर्णिमा तिथी ही 17 सप्टेंबर रोजी असणार आहे. निरण्यकदीपमध्ये गर्गाचार्यांनी भाद्रपदाची पौर्णिमा वगळता इतर पौर्णिमेला पिंडदान निषिद्ध अमानलं जातं. कारण भाद्रपदाची पौर्णिमा अमावस्या समतुल्य मानली जाते. त्यामुळे पितृ पक्ष 17 सप्टेंबरपासून सुरू होऊन 2 ऑक्टोबरपर्यंत चालणार असणार आहे.
17 सप्टेंबर- मंगळवार पौर्णिमा श्राद्ध
18 सप्टेंबर - बुधवार प्रतिपदा तिथी (पितृपक्षाला सुरूवात )
19 सप्टेंबर- गुरुवार द्वितीया तिथी
20 सप्टेंबर - शुक्रवार तृतीया तिथी
21 सप्टेंबर- शनिवार चतुर्थी तिथी
22 सप्टेंबर- सोमवार पंचमी तिथी
23 सप्टेंबर- सोमवार षष्ठी आणि सप्तमी तिथी
24 सप्टेंबर - मंगळवार अष्टमी तिथी
25 सप्टेंबर- बुधवार नवमी तिथी
26 सप्टेंबर- गुरुवार दशमी तिथी
27 सप्टेंबर- शुक्रवार एकादशी तिथी
28 सप्टेंबर- रविवार द्वादशी तिथी
30 सप्टेंबर- सोमवार त्रयोदशी तिथी
1 ऑक्टोबर- मंगळवार चतुर्दशी तिथी
2 ऑक्टोबर- बुधवार सर्व पितृ अमावस्या
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)