Ghat Visarjan 2022: देशभरात नवरात्रीचा (Navratri 2022) उत्साह शिगेला आला आहे. घरोघरी महिलांनी घटस्ठापना (Ghatsthapana 2022) आणि अखंड दिवाची पूजा सुरु आहे. आता घट विसर्जन कधी आहे यावर अनेक महिलांमध्ये संभ्रम आहे. 4 की 5 ऑक्टोबर 2022 नेमकं कधी घट विसर्जन करायचं याबद्दल त्यांचा मनात प्रश्न निर्माण झाला आहे. तर आपण जाणून घेऊयात कधी करायचं आहे घट विसर्जन...
आश्विन शुद्ध दशमी म्हणजे विजयादशमी (Vijayadashami 2022) ...म्हणजेच दसरा 2022...(Dussehra 2022) घटची स्ठापना केल्यानंतर 9 दिवस त्याची आराधना केली जाते. घटला रोज एक माळ अपर्ण केली जाते. 9 दिवस घटस्थापना केल्यावर 10 व्या दिवशी दसरा साजरा केला जातो. म्हणजे याच दिवशी दसऱ्याला घट विसर्जन केलं जातं. तर काही जण कुळाचाराप्रमाणे 9 वीला तर कोणी दशमीला घट विसर्जन करतात. तर यावर्षी घटाचं विसर्जन 4 ऑक्टोबर 2022 मंगळवारी म्हणजे खंडे महानवमीला केलं जाणार आहे. (ghat visarjan 2022 and ghat visarjan 4 October 2022 or 5 October 2022 nmp)
शास्त्रानुसार 4 ऑक्टोबर 2022 (4 October 2022) मंगळवारी (Tuesday) सकाळी 11 पासून दुपारी 2 वाजतेपर्यंत शुभ मुहूर्त आहे.
घट कधीही स्त्रीयांनी उठवू नये. घट कायम पुरुषांनी उठवावा, असं शास्त्रात सांगितलं आहे. शास्त्रानुसार घट उठवण्यासाठी 5 पुरुष किंवा 5 लहान मुलं बोलवायला पाहिजे.
घट विसर्जन झाल्यावर म्हणजे 4 ऑक्टोबर 2022 ला तुम्ही 12.30 ते 5 दरम्यान तुम्ही उपवास सोडू शकता. याशिवाय घटस्थापनेसाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचं काय करायचं याबद्दल हा व्हिडीओ पाहा...