Gudi Padwa 2023 : गुढी पाडव्याचा मुहूर्तावर आज Gajkesari Rajyog, 'या' राशींच्या लोकांना धनलाभ

Gudi Padwa 2023 : गुढी पाडवा आणि चैत्र नवरात्रीच्या मुहूर्तावर ग्रहांचाही अत्यंत दुर्मिळ योग जुळून आला आहे. वैदिक ज्योतिषानुसार (Guru Chandra Yuti in Meen 2023 ) गजकेसरी राजयोगमुळे 6 राशीच्या लोकांचं नशीब पालटणार आहे. जाणून घ्या तुमची रास यात आहे का?

Updated: Mar 22, 2023, 09:26 AM IST
Gudi Padwa 2023 : गुढी पाडव्याचा मुहूर्तावर आज Gajkesari Rajyog, 'या' राशींच्या लोकांना धनलाभ
Gudi Padwa 2023 Chaitra Navratri 2023 Gajkesari Rajyog 2023 Guru Chandra Yuti in Meen 2023 zodiac signs a lot money Astro news in marathi

Gudi Padwa 2023 Gajkesari Rajyog Effect zodiac signs in marathi : दुःख सारे विसरुन जाऊ, सुख देवाच्या चरनी वाहू, स्वप्ने उरलेली… नव्या या वर्षी, नव्या नजरेने नव्याने पाहू…

गुढीपाडवा (Gudi Padwa 2023) म्हणजे मराठी लोकांचं नवं वर्ष...प्रभू रामचंद्र हे चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्येला परत आले तो हा दिवस...अयोध्यावासियांनी गुढ्या तोरणं उभारुन श्रीरामांचं स्वागत केलं होतं. गुढीपाडव्यासोबत आजपासून घरोघरी चैत्र नवरात्रीचा (Chaitra Navratri 2023) उत्साह दिसून येणार आहे. घटस्थापना करुन देवी मातेच्या नऊ रुपांची आराध्यना केली जाणार आहे. अशा या दुहेरी योगासोबत अवकाशात ग्रहांचेही अत्यंत दुर्मिळ योग जुळून आला आहे. 

आज मीन राशीत गुरू आणि चंद्र यांचा संयोग होणार आहे. यामुळे गजकेसरी योग तयार होतो आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशीला (zodiac signs Horoscope) हा गजकेसरी योग अमाप धन, प्रगती आणि यश देणार आहे ते..

मेष (Aries)

या राशीच्या लोकांसाठी गजकेसरी योग फलदायक ठरणार आहे. परदेशातून आर्थिक लाभ होणार, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. अचानक धनलाभ होणार आहे. स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना यश मिळले. 

वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांसाठी गजकेसरी योग भाग्यशाली ठरणार आहे. नोकरी व्यवसायात मोठं यश मिळणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होणार आहे. 

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग भाग्यशाली ठरणार आहे. करिअरमध्ये फायदा होणार असून नवीन नोकरीची संधी मिळणार आहे. अचानक धनलाभ होणार आहे. गुढीपाडव्याचा मुहूर्तावर घर कार बुक करण्याचा योग आहे. 

कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग खूप फलदायी ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगती होणार आहे. परदेशी जाण्याचे योग आहेत. सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. 

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग आर्थिक प्रगती घेऊन आला आहे. अचानक तुम्हाला पैशांचा लाभ होणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी मान सन्मान वाढणार आहे. नवीन करार होणार आहे ज्याचा फायदा भविष्यात दिसणार आहे. 

मीन (Pisces)

मीन राशीतच गजकेसरी योग दिसून येणार आहे त्यामुळे या राशीला सर्वाधिक लाभ होणार आहे. आर्थिक लाभासोबतच कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. नातेसंबंध घट्ट होणार आहेत. नोकरी व्यवसायात प्रगती होणार आहे.  

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)