April Festival Calendar 2024 : गुढीपाडवा, रामनवमी ते हनुमान जयंतीपर्यंत..! जाणून घ्या एप्रिल महिन्यातील सण, व्रतांची योग्य तिथी

April 2024 Festivals Full List in Marathi : हिंदू धर्मात सण, उत्सव आणि व्रतांना अतिशय महत्त्व आहे. हिंदू पंचांग किंवा कालनिर्णयनुसार प्रत्येक महिन्यात कुठला ना कुठला सण असतो. एप्रिल महिन्यातील सण, व्रतांची योग्य तारीख आताच नोंद करुन घ्या. 

नेहा चौधरी | Updated: Mar 28, 2024, 09:06 AM IST
April Festival Calendar 2024 : गुढीपाडवा, रामनवमी ते हनुमान जयंतीपर्यंत..! जाणून घ्या एप्रिल महिन्यातील सण, व्रतांची योग्य तिथी title=
Gudipadwa Ram Navami to Hanuman Jayanti April 2024 Festivals Full List in Marathi

April 2024 Festivals Full List in Marathi : हिंदू धर्मातील शेवटाचा सण होळी साजरा करण्यात आला आलाय. आता सर्वांना वेध लागले आहेत ते हिंदू नववर्ष, मराठी लोकांचं गुढीपाडवा कधी आहे. त्यासोबतच राम नवमी, चैत्र नवरात्र आणि हनुमान जयंतीचा उत्साह कधी साजरा करायचा आहे. एप्रिल महिन्या हा अनेक महत्त्वाचे सण असणार आहे. या महिन्यात  पापमोचनी एकादशी आणि कामदा एकादशीलाही व्रत ही असणार आहे. त्याशिवाय वर्षातील पहिलं सूर्यग्रहणही हे एप्रिल महिन्यात असेल. यासगळ्या सण, व्रतांची तिथींची आताच नोंद करुन घ्या. (Gudipadwa Ram Navami Chaitra Navratri to Hanuman Jayanti and Solar Eclipse April 2024 Festivals Full List in Marathi)

एप्रिल महिन्यातील सण, व्रतांची योग्य तिथी !

01 एप्रिल - शीतला सप्तमी, कालाष्टमी
05 एप्रिल - पापमोचिनी एकादशी
06 एप्रिल - पापमोचिनी एकादशी पारण, शनि त्रयोदशी, प्रदोष व्रत
07 एप्रिल - मासिक शिवरात्री
08 एप्रिल - सोमवती अमावस्या, दर्श अमावस्या, सूर्यग्रहण
09 एप्रिल - चैत्र प्रारंभ, गुढीपाडवा, चैत्र नवरात्री, झुलेलाल जयंती
11 एप्रिल - मस्त्य जयंती, गौरी पूजा, चैरगौर, मासिक कार्तिगाई
12 एप्रिल - लक्ष्मी पंचमी, रोहणी व्रत, विनायक चतुर्थी
13 एप्रिल - मेष संक्रांती, बैसाखी, स्कंद षष्ठी
14 एप्रिल - यमुना छठ
16 एप्रिल - महातारा जयंती, मासिक दुर्गाष्टमी
17 एप्रिल - रामनवमी, स्वामी नारायण जयंती
19 एप्रिल - कामदा एकादशी
20 एप्रिल - कामदा एकादशी पारण, वामन द्वादशी
21 एप्रिल - महावीर स्वामी जयंती, प्रदोष व्रत
23 एप्रिल - हनुमान जयंती, चैत्र पौर्णिमा
27 एप्रिल - विकट संकष्ट चतुर्थी