Hans Rajyog, Budhaditya Rajyog : ग्रहांचा राजकुमार बुध 24 जून म्हणजे शनिवार आपलं ग्रह (Budh Gochar 2023) बदलणार आहे. तो सकाळी 12:48 वाजता मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. पुढील 8 जुलै रोजी सकाळी 12:19 पर्यंत तो मिथुन राशीत असणार आहे. बुध गोचरमुळे मिथुन राशीत बुध आणि सूर्याच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. त्यासोबतच शुभ असा हंसराजयोग जुळून आला आहे. (guru and sun make hans rajyog on june 24 budh gochar 2023 made mercury transit in gemini budhaditya rajyog positive impact zodiac signs)
या राजयोगामुळे 5 राशीच्या लोकांना नोकरी, व्यवसाय, आरोग्य आणि संपत्तीच्या बाबतीत लाभ लाभच होणार आहे. (budh gochar 2023 budhaditya rajyog zodiac effects)
या राशीच्या लोकांना बंपर लॉटरी लागणार आहे. शैक्षणिक स्पर्धेशी संबंध असणाऱ्या लोकांना घवघवीत यश मिळणार आहे. व्यवसायिकांसाठी हा काळ बेस्ट असणार आहे. नवविवाहितांना आनंदाची बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे.
कन्या राशीच्या लोकांना या राजयोगामुळे फायदाच फायदा होणार आहे. परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होईल. वैवाहिक जीवनात सुखसमृद्धी नांदणार आहे. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी घरातील लोकांचा सल्ला घ्या.
तूळ राशीच्या लोकांसाठी हा राजयोग शुभ ठरणार आहे. परदेशात जाण्याचे योग आहेत. वैवाहिक जीवनात प्रेम वाढणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे. तुम्हाला मोठी जबाबदारी मिळणार आहे. ज्यामुळे भविष्यात नाव आणि प्रसिद्धी मिळणार आहे.
धनु राशीच्या व्यावसायिकांसाठी हा काळ सर्वाधिक फलदायी ठरणार आहे. तुम्हाला चांगला नफा मिळणार आहे. नवीन भागीदार मिळणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदच आनंद असणार आहे. प्रकृतीमध्ये सुधारणा होणार आहे.
बुध, मंगळ, गुरु, शुक्र आणि शनि हे वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रभावशाली ग्रह आहेत. जेव्हा कुंडलीत मध्य भागी हे ग्रह मजबूत स्थितीत असेल तर पंच महापुरुष राजयोग तयार होतो. यातील एक योग म्हणजे हंस राजयोग आहे. गुरु हा अतिशय शुभ ग्रह असून तो शिक्षण आणि ज्ञानाचा कारक आहे. बृहस्पति कुंडलीत असेल किंवा चंद्र कर्क, धनु आणि मीन राशीच्या पहिल्या, चौथ्या, सातव्या आणि दहाव्या भावात असेल तेव्हा हंसराज योग तयार होतो.
हंस राजयोगामुळे सुख, समृद्धी, संपत्ती आणि आध्यात्मिक शक्ती तुम्हाला प्राप्त होते. मान-सन्मानाचे लाभ, पैशाची गुंतवणूक नोकरी, भौतिक ज्ञान आणि संपत्ती वाढ होते.