Hanuman Jayanti 2024 Date : श्री प्रभूचे परम भक्त...मंदिरात त्यांच्याशिवाय रामाची मूर्ती अपूर्ण मानली जाते असे हनुमानजी. यांची जयंती रामनवमीनंतर काही दिवसांमध्ये येते. पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. भारतात काही ठिकाणी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीलाही हनुमान जयंती साजरी करण्यात येते. अंजनी पुत्र हनुमानजी यांची जयंती तिथीला ग्रह आणि नक्षत्रांचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. अशा या हनुमान जयंतीची शुभ तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि कोणत्या राशींसाठी ही फलदायी आहे जाणून घ्या. (Hanuman jayanti 2024 date time shubh muhurat puja these zodiac sign people will get super success and money)
चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी सुरुवात - 23 एप्रिलला पहाटे 3:25 वाजता
चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी समाप्त - 24 एप्रिल पहाटे 5:18 वाजेपर्यंत
हिंदू धर्मात उदय तिथीनुसार सण साजरे करण्यात येतात. त्यानुसार हनुमान जयंतीचा उत्साह हा 23 एप्रिलला साजरा करण्यात येणार आहे.
पूजेची वेळ - 23 एप्रिलला सकाळी 9.03 ते 10.41 वाजेपर्यंत
ब्रह्म मुहूर्त - 23 एप्रिलला सकाळी 4:20 ते 05:04 वाजेपर्यंत
अभिजीत मुहूर्त - सकाळी 11:53 ते दुपारी 12:46 वाजेपर्यंत
हनुमान जी का मूल मंत्र:
ॐ ह्रां ह्रीं ह्रूं ह्रैं ह्रौं ह्रः॥ हं हनुमते रुद्रात्मकाय हुं फट्।
श्री हनुमते नमः:
हनुमान जयंती येत्या 23 एप्रिल मंगळवारी साजरी करण्यात येणार आहे. हिंदू धर्मानुसार मंगळवार हा हनुमानजीचा पूजा वार मानला जातो. अशास्थितीत या हनुमान जयंतीचा दुहेरी योग जुळून आला आहे. यादिवशी चित्रा नक्षत्रात सिद्ध योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. तर मीन राशीमध्ये पंचग्रही योग निर्माण होणार आहे. याचा लाभ काही राशींच्या लोकांना मिळणार आहे. त्यात तुमची रास आहे का जाणून घ्या.
या राशीच्या लोकांना हनुमान जयंती फलदायी सिद्ध होणार आहे. त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होणार असून व्यसायात फायदा होणार आहे. तुमचं बँक बॅलेन्स वाढणार आहे. बेरोजगारांना नवीन संधी मिळणार आहे.
हनुमान जयंती या लोकांसाठी प्रगती आणि यश घेऊन आली आहे. जुन्या तणावासून तुम्हाला आराम मिळणार आहे. करिअर आणि व्यावसायात यश मिळणार आहे. आत्मविश्वास वाढणार असून आर्थिक स्थिती सुधारणार आहे.
या लोकांसाठी हनुमान जयंती अतिशय लाभदायक ठरणार आहे. बिझनेसमध्ये चांगला नफा मिळणार आहे. भागीदारीमधील काम चांगल यश आणि प्रगती देणार आहे. करिअरमध्ये चांगली बातमी मिळणार आहे. कुटुंबात आनंदच आनंद असेल. त्यांच्या कामात प्रगती होणार आहे.
या लोकांनावर बलजरंग बलीची कृपा बरसणमार आहे. तुम्हाला बिझनेसमध्ये सर्व बाजूने नफा मिळणार आहे. आयुष्यात आनंद आणि शांती लाभणार आहे. मुलांकडून प्रेम आणि आदर मिळणार आहे. कुटुंबात शुभ कार्य घडणार आहे. तुमचे अडकलेले पैसे परत मिळणार आहे.
हनुमान जयंती कुंभ राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये यश घेऊन येणार आहे. नवीन नोकरीची संधी मिळणार आहे. संपत्ती वाढ आणि व्यवसायात पैसे मिळणार आहे. नवीन व्यवसायासाठी चांगला काळ असेल. नातेवाईक आणि मित्रांकडून काही चांगली बातमीने तुमचं मन प्रसन्न असणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)