Horoscope 13 April 2024 : 'या' राशींच्या लोकांनी आज विचारपूर्वक काम करावं!

Horoscope 13 April 2024 : आज चैत्र नवरात्रीचा पाचव्या दिवस आहे. आज स्कंदमातासह हनुमानजी आणि शनिदेवाची पूजा करण्यात येणार आहे. आजचा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या तुमचं राशीभविष्य ज्योतिषाचार्य प्रीतिका मोजुमदार यांच्याकडून

नेहा चौधरी | Updated: Apr 13, 2024, 06:50 AM IST
Horoscope 13 April 2024 : 'या' राशींच्या लोकांनी आज विचारपूर्वक काम करावं! title=
daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 13 april 2024

Horoscope 13 April 2024 : शनिवार म्हणजे अनेकांसाठी सुट्टीचा वार. त्यामुळे शनिवारसाठी तुम्ही अनेक कार्य ठरवले असतील. काहींनी आराम करायचा ठरवला असेल तर काहींनी महत्त्वाची कामं करण्याच ठरवलं असेल. शनिवार म्हणजे हनुमानजी आणि शनिदेवाची आराधना करण्याचा वार आहे. त्यात चैत्र नवरात्रीचा आज पाचव्या दिवस आहे. अशात आजचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे जाणून घ्या राशीभविष्य ज्योतिषाचार्य प्रीतिका मोजुमदार यांच्याकडून

मेष (Aries Zodiac)  

आजच्या दिवशी प्रत्येक काम विचारपूर्वक करा. चुकीच्या निर्णयामुळे नुकसान किंवा विलंब होण्याची भीती आहे. कुटुंबातील वडीलधाऱ्यांशी किंवा कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. महिला आज घरात आणि बाहेर आपल्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करतील त्यामुळे घरातील वातावरण अशांत होऊ शकतं. संध्याकाळनंतर आर्थिक लाभ होऊ शकतो. 

वृषभ (Taurus Zodiac) 

आज तुम्ही जुन्या कामांना पूर्ण विराम देणार आणि नवीन कामाचा शुभांरभ करणार आहात. मात्र यात अनेक अडथळे येणार असून तुम्ही त्यावर मात करण्यात यशस्वी होणार आहात. नोकरदार लोकांना आज अतिरिक्त काम करण्यात अडचणी येणार आहे. आर्थिक बाबींमध्ये विलंब होणार आहे. आज अनैतिक कामांपासून दूर राहा नाही तर तुमचं मोठं नुकसान होईल. कामाच्या ताणामुळे महिला अस्वस्थ राहणार आहेत. 

मिथुन (Gemini Zodiac)

आज तुम्ही दिखाऊपणावर जास्त खर्च करणार आहात. आज तुम्हाला तुमच्या कामाच्या व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळणार आहेत. उच्च स्पर्धेमुळे तुम्हाला तुमच्या मेंदूचा व्यायाम करावा लागणार आहे. सामाजिक स्तरावर आज तुमची प्रतिमा श्रीमंतांसारखी असणार आहे. 

कर्क (Cancer Zodiac)   

पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा लाभ न मिळाल्याने आज निराश असणार आहात. महत्त्वाची कामं अपूर्ण राहिल्याने आर्थिक समस्या निर्माण होणार आहे. स्पर्धा जास्त असल्याने कामात मंदी असणार आहे. कमिशनच्या कामातून मध्यम लाभ होणार आहे. कौटुंबिक कलहामुळे आज कौटुंबिक वातावरण अशांत असेल. शेजाऱ्यांशीही वाद होण्याची शक्यता आहे. 

सिंह (Leo Zodiac) 

सामाजिक क्षेत्रातील तुमच्या योगदानाची आज प्रशंसा होणार आहे. वरिष्ठांशी नवीन संपर्क होईल आणि संध्याकाळी व्यवसायात वाढ झाल्यामुळे पैशाची आवक अपेक्षेपेक्षा जास्त होणार आहे. आज तुम्हाला तुमच्या पत्नी आणि मुलाकडूनही लाभदायक बातमी कानावर पडणार आहे. संध्याकाळ मनोरंजनात घालवणार आहात. लांबच्या प्रवासाचे आणि पर्यटनाचे बेत आखणार आहात. 

कन्या (Virgo Zodiac)   

आज तुम्ही तुमच्या वक्तृत्वाने आणि गोड बोलण्याने फायदेशीर व्यावसायिक संबंध निर्माण करणार आहात. आज तुमचे विचार सुधारतील आणि तुम्ही विचार न करताही लोकांना मदत करणार आहात. कुटुंबातील सदस्यांशी संबंध सौहार्दपूर्ण असणार आहे. केवळ दिखाव्यासाठी महिला काही कारणाने रागवणार आहेत. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असणार आहात. मुलाशी मतभेद होण्याची शक्यता आहे.  

तूळ (Libra Zodiac)  

आजचा दिवस व्यापार तसंच सामाजिक दृष्टिकोनातून लाभदायक असणार आहे. आज तुम्हाला प्रत्येक कामाचे शुभ परिणाम मिळणार आहे. व्यवसायात अपेक्षित यश मिळाल्याने मन प्रसन्न असणार आहे. जुन्या कामांतून आर्थिक लाभ होणार आहे, मात्र आज काम सुरु करु नका. लग्न करू इच्छिणाऱ्यांसाठी योग्य जोडीदाराचा शोध पूर्ण होणार आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणे सोपे होणार आहे. 

वृश्चिक (Scorpio Zodiac)   

आज तुम्हाला दिवसभर सतर्क राहण्याची गरज आहे. कमकुवत आरोग्यामुळे स्वभावात चिडचिडेपणा असणार आहे. परिणामी, प्रिय व्यक्तीशी मतभेदाच्या घटना घडणार आहेत. आज कामावर लक्ष केंद्रित होणार नाही. आज कायदेशीर गुंतागुंतीमध्ये अडकण्याची शक्यता आहे. आज महिलांना वाईट परिस्थितीतून जावे लागणार असून विनाकारण त्रास कोणाला देऊ नका. 

धनु (Sagittarius Zodiac) 

आजचा दिवस तुम्ही मौजमजेत घालविणार आहात. पूर्वी केलेले प्रयत्न आज यशस्वी झाले तर मानसिक शांती मिळणार आहे. नवीन कामाच्या करारासाठी योजना तयार ठेवा, त्यावर लवकरच काम सुरू होणार आहे. आज केलेली भांडवली गुंतवणूक भविष्यासाठी चांगली असणार आहे. प्रेमप्रकरणात जवळीक अनुभवाल, मात्र दूर राहणारे नातेवाईक आणि शेजारी यांच्याशी संबंध सामान्य असणार आहे. महिलांनाही संपत्तीचा लाभ मिळणार आहे. संध्याकाळ कुटुंबासोबत शांततेत वेळ घालविणार आहात. दुखापत होण्याची भीती आहे. 

मकर (Capricorn Zodiac)   

दिवसाच्या पूर्वार्धात तुमची प्रकृती बिघडल्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटणार आहे. आजारपणावर अनपेक्षित खर्च होणार आहे. आज तुमच्या इच्छा पूर्ण होण्यास काही अडथळे येणार आहेत. भावांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. बोलण्यात आणि वागण्यात काळजी घ्या. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित काम तूर्तास स्थगित करा. अनपेक्षित प्रवासामुळे थकवा वाढणार आहे. आज पैसे उधार घेऊ नका. स्त्रिया त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे इतर लोकांना डिवचणार आहे. 

कुंभ (Aquarius Zodiac) 

आज तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणार आहात. आज तुम्ही तुमच्या कुटुंबाप्रती अधिक संवेदनशील असणार आहात. तरीही तुम्ही एकाच वेळी सर्वांना आनंदी ठेवू शकणार नाहीत. दुपारनंतरच नोकरी व्यवसायात समाधानकारक लाभ होणार आहे. आज तुम्ही मनोरंजन आणि विश्रांतीमध्ये अधिक वेळ व्यतित करणार आहात. मौजमजा आणि छंदांसोबतच घरगुती सुखसुविधा पुरवण्यातही खर्च होणार आहे. धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. तुमच्या वागण्याने वृद्ध लोक दुखावणार आहेत. 

मीन  (Pisces Zodiac)  

आजचा दिवस सहकाऱ्यांच्या नाराजीमुळे घरातील कामात समन्वय राखण्यासाठी कठीण जाणार आहे. दैनंदिन कामात विलंब झाल्यामुळे दिवसभरासाठी केलेले बेत उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. आळस सोडा आणि तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे तुमच्यासाठी फायद्याच ठरेल. थोडा उशीर केला तरी यश नक्कीच मिळणार आहे. आज महिला अधिक भावूक होतील आणि छोट्या छोट्या गोष्टी मनावर घेणार आहेत. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)