Hartalika 2024 : ...म्हणून म्हणतात हरतालिकेचे व्रत सोपं नसतं, पहिल्यांदाच करणार असाल तर 'ही' माहिती अतिशय कामाची

Hartalika 2024 : मनासारखा नवरा मिळावा म्हणून कुमारिका मुली हरतालिकेच व्रत आणि उपवास करतात. पण हे व्रत करणं सोपं नसतं. तुम्ही पहिल्यांदाच हे व्रत करणार असाल तर ही माहिती अतिशय कामाची आहे. 

नेहा चौधरी | Updated: Sep 5, 2024, 05:12 PM IST
Hartalika 2024 : ...म्हणून म्हणतात हरतालिकेचे व्रत सोपं नसतं, पहिल्यांदाच करणार असाल तर 'ही' माहिती अतिशय कामाची  title=
hartalika teej or Hartalika fast is very difficult take care of these things

Hartalika 2024 Fast : हिंदू धर्मात अनेक व्रतवैकल्य असतात. त्यातील जास्त जास्त व्रत हे विवाहित महिलांसाठी असतात. पण हरतालिका हे व्रत फक्त असं आहे जे कुमारिका मुली आपल्या भावी नवऱ्यासाठी करु शकतात. मनासारखा नवरा व्हावा म्हणून हरतालिकेच व्रत केलं जातं. कारण पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने शंकरदेवाला आपला पत्नी बनवण्यासाठी हे व्रत केलं होतं. नदी काठी वाळूच शिवलिंग बनवून त्याची पूजा केली आणि निर्जल हे व्रत केलं. त्यामुळे शंकर देव प्रसन्न झाले आणि तुझी इच्छा पूर्ण होईल असं वर दिलं. त्यानंतर पार्वती आणि शंकरदेवाचा विवाह झाला. 

पार्वती मातेने ज्या तिथीवर हे व्रत केलं ते भाद्रपद शुक्ल पक्षाच्या तृतिया तिथीला होतं. तेव्हापासून भाद्रपद शुक्ल पक्षाच्या तृतिया तिथीला माता पार्वती आणि महादेवाचा पूजा करण्यात येते. या पूजेद्वारे सुखी संसार, पूत्र प्राप्ती आणि पतीच्या दीर्घयुष्याची कामना केली जाते. तर कुमारिका मुली मनासारखा नवरा मिळावा म्हणून हे व्रत करतात.

हेसुद्धा वाचा - Hartalika 2024 : हरतालिका व्रताच्या दिवशी राहुकाळ! फक्त 'या' मुहूर्तावर करता येणार पूजा

हे व्रत सकाळी लवकर उठल्यावर आंघोळ करुन केलं जातं. दिवसभर कोणी पाणी पिऊ तर काही जण फळं खाऊ हा उपवास करतात. खरं तर हरतालिकेचे व्रत हे निर्जल उपवास असतो. शिवाय हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो. त्यामुळे हे व्रत करणे फार कठीण असतं. त्याशिवाय हे व्रत एकदा सुरु केल्यास ते आजन्म करावं लागतं, शास्त्रानुसार ते मध्येच सोडून देता येतं नाही. या दिवशी आळस करू नये किंवा झोपून राहू नये, असं शास्त्रात सांगण्यात आलंय. यादिवशी रात्री जागरण करायचं असतं. 

हेसुद्धा वाचा - Hartalika 2024 : हरतालिकेच्या आदल्या दिवशी का करतात 'आवरणं'? काय आहे या शब्दाचा अर्थ?

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)