Horoscope 08 March 2022 : मंगळवार 'या' राशींच्या लोकांसाठी लाभदायक

आजचा दिवस 'या' राशीच्या लोकांसाठी असेल खास, ज्यामुळे तुम्ही राहाल प्रसन्न   

Updated: Mar 8, 2022, 07:44 AM IST
Horoscope 08 March 2022 :  मंगळवार 'या' राशींच्या लोकांसाठी लाभदायक title=

मेष : लाभाचे नवीन मार्ग दिसतील. छोट्या प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. एखाद्या मालमत्तेबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल. बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या गोष्टी पूर्ण होऊ लागतील. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. 

वृषभ : लहानसहान गोष्टींवर रागावणे टाळावे. एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल तुमचे विचार बदलू शकतात. रागावर नियंत्रण ठेवा. आर्थिक कामात एकाग्रतेने मन शांत राहील. 

मिथुन : तुमचा दिवस चांगला जाईल. नोकरीत तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. तुम्हाला उत्पन्न वाढवण्याच्या काही चांगल्या संधीही मिळू शकतात. सामाजिक आघाडीवर नेटवर्किंग फायदेशीर ठरेल. कुटुंबातील तुमची सकारात्मक वागणूक लोकांना प्रभावित करेल.

कर्क : स्वत:साठी वेळ काढणे चांगले राहील. परस्पर विश्वासाच्या मदतीने कौटुंबिक संबंध दृढ होतील. शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी दिवस शुभ आहे. तुमचे उत्पन्न चांगले राहील. काही अनोळखी लोकांची भेट होऊ शकते.

सिंह: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत खास असेल. तुम्ही तुमच्या गोड स्वभावाने कार्यक्षेत्रात यश मिळवाल. आजचा दिवस कामासाठी उत्तम आहे. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. कोणावर लवकर विश्वास ठेवू नका. जोडीदारासोबत काही नवीन नियोजन कराल.

कन्या : मन प्रसन्न राहील. कुटुंबासोबत वेळ व्यतीत कराल. कामकाजात फायदा होण्याची शक्यता आहे. चांगल्या व्यक्तींसोबत नवीन ओळख होईल. कामात यश मिळेल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. 

तूळ : राजकारणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. काहीतरी नवीन करण्याचा उत्साह आणि ध्यास मनात दिसून येईल.  घरात नवीन पाहुण्यांच्या आगमनाची माहिती मिळू शकते. विवाहित लोक त्यांच्या घरगुती जीवनाबद्दल सकारात्मक राहतील.

वृश्चिक: तुमची उदार भावना लोकांना खूप प्रभावित करेल. अभ्यासात तुमची कामगिरी चांगली राहील. खाद्यपदार्थ व्यापार्‍यांसाठी चांगला काळ आहे. विद्यार्थ्यांना तज्ञ शिक्षकांची मदत मिळेल. एखाद्यावर जास्त विश्वास ठेवल्याने ताण येऊ शकतो.

धनु : दिवसाची सुरुवात नव्या आशेने होईल. जवळच्या व्यक्तींसोबत भेटी होतील, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. जाणकार आणि वरिष्ठ लोकांसोबत काम करण्याची संधी सोडू नका. यावेळी व्यापाऱ्यांनी अत्यंत सावधगिरीने काम करणे गरजेचे आहे. आर्थिक बाबी पक्षात सोडवता येतील.

मकर : चांगली बातमी मिळेल. प्रतिष्ठित व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. घरात प्रेम आणि समजूतदारपणा दिसून येईल. तुम्ही एखाद्या प्रकल्प संशोधनावर काम करू शकता. व्यावसायिकांनी प्रामाणिकपणे काम करावे. कोर्ट-कचेरीच्या कामातून सुटका मिळेल. तुमची जबाबदारी वेळेवर पूर्ण करू शकाल.

कुंभ :  स्वत:साठी वेळ काढणे चांगले राहील. परस्पर विश्वासाच्या मदतीने कौटुंबिक संबंध दृढ होतील. शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी दिवस शुभ आहे. तुमचे उत्पन्न चांगले राहील. काही अनोळखी लोकांची भेट होऊ शकते.

मीन: आजच्या दिवसाची सुरूवात चांगली होईल. कामकाज आणि कुटुंबात सर्व काही सुरळीत असेल. कार्यक्षेत्रात कामगिरी उत्तम राहील. वरिष्ठांकडून योग्य सल्ला घ्या. कुटुंबाच्या गरजांची पूर्ण काळजी घ्याल. वायफळ खर्च टाळा. महनतीचं फळ मिळेल.