Horoscope 12 December 2021 | रविवारी या 4 राशींचं भाग्य फळफळणार, असा असेल दिवस

रविवारचा दिवस (Horoscope 12 December 2021) कसा असेल हे आपण जाणून घेऊयात एस्ट्रो गुरु बेजान दारुवाला यांचे पुत्र चिराग दारुवाला यांच्याकडून. 

Updated: Dec 11, 2021, 09:35 PM IST
Horoscope 12 December 2021 | रविवारी या 4 राशींचं भाग्य फळफळणार, असा असेल दिवस title=

मुंबई : रविवारचा दिवस (Horoscope 12 December 2021) तुमच्यासाठी आनंददायी ठरेल. नोकरीत-व्यवसायिंकाना धनलाभ होईल. विवाहासाठी उत्सूक असलेल्यांना स्थळ येईल. गुंतवणूक करण्याचा विचार करु शकता. रविवारचा दिवस कसा असेल हे आपण जाणून घेऊयात एस्ट्रो गुरु बेजान दारुवाला यांचे पुत्र चिराग दारुवाला यांच्याकडून. (Horoscope 12 December 2021 this 4 zodiac signs will shine on Sunday know your astrology prediction) 
 
मेष (Aries) : आजचा दिवस चांगला आहे. आर्थिकरित्या दिवस चांगला आहे. उत्पन्नात वाढ होईल. व्यवसायात नवे प्रयोग करु शकता. कुटुंबात सर्व आनंदी असतील. 

वृषभ (Taurus) : इतरांना मदत केल्याने तुम्हाला लाभ होईल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी योग्य वेळ आहे. कुटुंबियांसह असलेल्या समन्वयामुळे तुम्हाला पुढे जाण्याचं धैर्य मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. 

मिथुन (Gemini) : दिवस संमिश्र स्वरुपाचा राहिल.  कामाच्या ठिकाणी होणारे बदल हे तुमच्यासाठी अनुकूल असतील. वरिष्ठांच्या सल्ल्यामुळे तुमचं काम मार्गी लागेल.  

कर्क (Cancer) : कुटुंबियांना तुमच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण कराल. नव्या बदलासाठी स्वत:ला तयार ठेवा. आर्थिक व्यवहार करण्यासाठी योग्य वेळ आहे. 

सिंह (Leo) :  तुमचा दिवस चांगला आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज घेऊ शकता. 

कन्या (Virgo) : रविवारचा दिवस चांगला जाईल. गरजूंची मदत कराल. हाती घेतलेलं प्रत्येक कामाला न्याय द्याल.     

तुळ (Libra) : तुमच्या कामाचा व्याप वाढवा. ज्यामुळे तुमचा फायदा होईल. कामात शॉर्टकट वापरण्याचा प्रयत्न कराल, ज्यामुळे तुमचं नुकसान होईल. 

वृश्चिक (Scorpio) : कामात तुमचा आत्मविश्वास वाढेल. कुटुंबाच्या संपत्तीत वाढ होईल. पदोन्नती होण्याची शक्यता आहे. 

धनु (Sagittarius) :  भविष्याच्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. दुसऱ्यांना सहकार्य करण्याचा योग आहे. विवाहासाठी उत्सुक असलेल्यांसाठी चांगले स्थळ येतील. 

मकर (Capricorn) : व्यापाराच्या माध्यमातून उत्पन्नाचे नवे मार्ग प्राप्त होतील. अधिक धनलाभ होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य लाभेल. 

कुंभ (Aquarius) : आजचा दिवस तुमच्यसाठी अनुकूल ठरेल. फायदा प्राप्त करण्यासाठी अनेक संधी मिळतील.    

मीन (Pisces) : आजचा दिवस चांगला आहे. जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या पसंतीच्या कंपनीत इंटरव्यूसाठी बोलावलं जाऊ शकतं.