Horoscope : अपेक्षेपेक्षा जास्त देणारा सोमवार, असा असेल आजचा दिवस

असा असेल आजचा दिवस 

Updated: Aug 23, 2021, 06:40 AM IST
Horoscope : अपेक्षेपेक्षा जास्त देणारा सोमवार, असा असेल आजचा दिवस  title=

मुंबई : सोमवारी व्यापारी आणि नोकरदार वर्गाचं नशीब खुलणार आहे. तुम्ही आज जो विचारही केला नसेल त्या सगळ्या गोष्टी आज पूर्ण होतील. आज भाग्य तुमच्यासोबत असेल. आज तुम्हाला तुमच्या बुद्धिमता आणि चतुराईची ओळख होईल. सगळी कार्य पूप्ण होतील. 

मेष : आज उत्साहात आपली सगळी काम पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. नोकरीत नवीन काही तरी शिकायला मिळेल. मन प्रसन्न असेल. 

वृषभ : बुद्धीमता आणि चतुराईची ओळख देणारा आजचा दिवस ठरेल. रखडलेली सर्व काम पूर्ण होतील. वाणी मधर ठेवा आणि मित्र परिवारासोबत वेळ घालवाल. घरात मंगल कार्य घडेल. 

मिथुन : सोमवारी कामात चांगल यश मिळेल. मेहनत आणि भाग्याचा उत्तम अनुभव आज मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहिल. आज चतुराईने आपलं काम पूर्ण कराल. 

कर्क : तुम्ही तुमच्या वडिलांचा आणि सज्जनांचा आदर करण्यात आघाडीवर असाल. दिवसाची सुरुवात एका चांगल्या बातमीने होणार आहे. कामात चांगले आर्थिक लाभ होतील. आपण पैसे देखील वाचवू शकता.

सिंह : भाग्य तुमच्या सोबत असेल. तुम्ही तुमच्या मित्र आणि परिचितांसोबत चांगला वेळ घालवाल. नवीन व्यवसाय योजनेवर काम करण्यासाठी हा काळ उत्तम आहे.

कन्या : कामासाठी सोमवार चांगला आहे. नवीन मित्राच्या मदतीने तुम्हाला तुमच्या योजनांमध्ये अपेक्षित यश नक्कीच मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील, पण अचानक खर्चही वाढणार आहेत. नशीब तुमच्या सोबत आहे.

तूळ : तुम्ही चांगल्या लोकांशी संपर्क प्रस्थापित कराल, जे तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. नवीन मैत्री तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरेल. नशिबाची चांगली साथ मिळेल. तुमच्या जिद्दीमुळे कुटुंबाला त्रास होईल.

वृश्चिक : विनाकारण आज कोणाशी भांडण होईल. आरोग्याच्या दृष्टीने तुमचे आरोग्य चांगले राहील. शरीरात चपळता राहील, नोकरी किंवा व्यवसायात चांगले यश मिळेल. तुम्ही तुमचे लक्ष चांगल्या कामावर केंद्रित कराल.
 
धनू : सोमवारी तुमचे वर्तन अतिशय सौम्य असेल. वागण्यातील बदल हा इतरांसाठी चर्चेचा विषय बनेल. आपल्या आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका. तुम्ही तुमच्या कामात परिश्रमपूर्वक काम कराल आणि कोणाच्या मदतीने तुम्हाला चांगले पैसे मिळतील.

मकर : तुमचा दिवस अधिक चांगल्या प्रकारे सुरू होणार आहे. तुम्ही तुमच्या हातात जे काही काम कराल त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. इतरांबरोबर मिळून केलेल्या कामातही चांगले लाभ होतील. मनात सकारात्मक विचार निर्माण होतील.

कुंभ : तुम्ही तुमच्या शत्रूंना तुमच्यावर वर्चस्व मिळू देणार नाही, पण तुम्ही त्यांना पराभूत करण्यात यशस्वी व्हाल. नशीब तुमच्या सोबत असणार आहे. कुटुंब आणि मित्रांसोबत बाहेर जाल, त्यांना चांगला पाठिंबा मिळेल. आरोग्यासाठीही दिवस चांगला आहे.

मीन: तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी चांगला दिवस जाईल. घरात पाहुण्यांच्या आगमनामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. तुमच्या मनात तुमच्या शिक्षकांबद्दल आणि वडिलांबद्दल आदर भावना वाढेल.