मुंबई : दिवाळीचा संपूर्ण दिवस बिजी असाल. आर्थिक स्थिती आधीपेक्षा आणखी चांगली असेल. चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. शांत रहा आणि स्वत:च्या उणिवांकडे लक्ष देण्याऐवजी चांगल्या गुणांकडे लक्ष द्या. गुरुवार (Horoscope 4 November 2021) कसा असेल, जाणून घेऊयात एस्ट्रो गुरु बेजान दारुवाला यांचे पुत्र चिराग दारुवाला यांच्याकडून. (Horoscope 4 November 2021 know all zodiac sign astrology prediction)
मेष (Aries) : दिवस चांगला असेल. कोणाचंही बोलणं मनावर घेणार नाहीत. पाल्य व्यवसायात मदत करतील. कलाकारासांठी दिवस चांगला आहे.
वृषभ (Taurus) : शारिरीक आणि मानसिकरित्या प्रसन्न आणि प्रफुल्लित राहाल. जीवनशैलीत बदल करु शकता. यशस्वी होण्यासाठी जोखीम पत्काराल. सहकाऱ्याकडून आनंदाची बातमी मिळेल.
मिथुन (Gemini) : काम पूर्ण झाल्याने आनंदी असाल. तुमच्यासाठी वेळ अनुकूल आहे. व्यापारासंदर्भात चांगली बातमी मिळेल. दिलेला शब्द पूर्ण न केल्याने मित्र नाराज होऊ शकतात.
कर्क (Cancer) : संपूर्ण दिवस व्यस्त राहाल. तुमच्या चांगल्या व्यवहारामुळे लोकं आकर्षित होतील. नव्या योजनांवर काम करणं फायदेशीर ठरेल. कार्य विस्तारामुळे कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. आर्थिक बाबीत यशस्वी व्हाल.
सिंह (Leo) : आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न कायम ठेवा. उत्पन्नाचे नवे मार्ग तयार होतील. आर्थिक स्थिती आधीपेक्षा आणखी मजबूत होईल. वरिष्ठांनी दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करु नका.
कन्या (Virgo) : दिवस चांगला राहिल. नव्या विचारामुळे आर्थिक फायदा होईल.
तुळ (Libra) : चांगली बातमी मिळेल. तुमच्यातील क्रीएव्हीटीमुळे लोंकांना तुमच्याकढे ओढवून घ्याल. महत्त्वाची कामं आधी उरकून घ्या. यशस्वी व्हाल. परिस्थितीचं भान ठेवून आर्थित गुंतवणूक करा. मित्रांसोबत काही गोष्टी शेअर करु शकता.
वृश्चिक (Scorpio) : महत्त्वाच्या कामात मित्रांचा सल्ला घ्या. अडकलेली कामं निकाली लागतील. व्यवसाय संबंधीत कामात सावध रहा. विम्यात गुंतवणूक करण्यासाठी दिवस शुभ आहे.
धनु (Sagittarius) : दिवस चांगला राहिल. मनापासून केलेल्या कामात यशस्वी व्हाल. व्यवहार करताना सावध रहा.
मकर (Capricorn) : थोडाशा प्रयत्नांमुळे यशस्वी व्हाल. रिएल एस्टेट क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना यश मिळू शकतं. आहारवर लक्ष द्या.
कुंभ (Aquarius) : वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करा. जबाबदारी यशस्वीपणे पार पाडा. महत्त्वाचा निर्णय घेताना कुटुंबियांची मतं लक्षात घ्या. व्यवसायिक क्षेत्रात लाभ होईल.
मीन (Pisces) : शांतचित्ताने काम केल्यास फायदेशीर ठरेल. लेखकांसाठी दिवस चांगला आहे. व्यवसायासंदर्भातील समस्या निकाली निघतील.