Horoscope October 29, 2021: शुक्रवारी कामाच्या ठिकाणी मिळणार शुभ संकेत, या राशींसाठी फायद्याचा दिवस

वृषभसोबत या 4 राशींसाठी मिळू शकते चांगली बातमी, वाचा 29 ऑक्टोबरचं राशीभविष्य

Updated: Oct 28, 2021, 10:31 PM IST
Horoscope October 29, 2021: शुक्रवारी कामाच्या ठिकाणी मिळणार शुभ संकेत, या राशींसाठी फायद्याचा दिवस

मुंबई: शुक्रवारी दिवस खास असणार आहे. नोकरी-व्यवसायात पुढे जाण्याचा मार्ग मोकळा होणार. कोणीतरी बोललं म्हणून मनावर घालणे टाळा. खगोल गुरू बेजान दारूवाला यांचा मुलगा चिराग दारूवाला यांच्याकडून जाणून घेऊया 12 राशींसाठी कसा असणार शुक्रवारचा दिवस.

मेष: या राशीच्या व्यक्तींना चांगली माहिती मिळू शकते. घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या दिशेने काही नवीन निर्णय घेऊ शकता. व्यवसाय, नोकरीसाठी दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. 

वृषभ: या राशीच्या व्यक्ती आपलं कौशल्य आणि समजूदारपणाने चांगल्या प्रकारे काम मार्गी लावतील. व्यवसायात चांगली बातमी मिळू शकते. आपलं म्हणणं योग्य पद्धतीनं मांडण्याची गरज आहे. 

मिथुन: या राशीच्या लोकांसाठी शुक्रवार अत्यंत खास असणार आहे. मनातील गोष्टी शेअर करा. करियरबाबत अधिक विचार करण्याची गरज आहे. मालमत्ता खरेदीसाठी दिवस चांगला आहे. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. 

कर्क: शुक्रवार या राशीच्या लोकांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. व्यापारामध्ये चांगला नफा होईल. भविष्याचा विचार करून तुम्ही गुंतवणूक करू शकता. नोकरीत यश मिळेल. . कोणत्याही जबाबदारीच्या कामात निष्काळजी राहू नका.

सिंह: बोललेली गोष्ट जिव्हारी लागेल त्यामुळे ती मनावर न घेणं हिताचं. नोकरी शोधणाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे. व्यावसायात फायदा होईल. कामाचं फळ चांगलं मिळेल. 

कन्या: संपत्ती आणि आर्थिक स्थिती चांगली राहील. मिळालेल्या वेळेचा योग्य उपयोग करा. खर्चावर वेळीच नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. घरातील महत्त्वाच्या कामात मदत करा. 

तुळ: कामात चांगल्या संधी मिळू शकतात. व्यापाऱ्यांना काही अडचणी येऊ शकतात. नवे मित्र तर भेटतील मात्र काळजी घ्या. 

वृश्चिक: आर्थिक स्थिती चांगली होऊ शकते. नवीन प्रोजेक्टवर काम करून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. तरुणांना उच्च शिक्षणाच्या चांगल्या संधी आहेत.

धनु: सकारात्मक विचारांमुळे तशाच गोष्टी घडायला लागतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. 

मकर: पैसे कमवण्यासाठी दिवस चांगला आहे. करियरशी संबंधित नवीन माहिती मिळेल. भूतकाळात घडलेल्या घटनांवरूनच वाद निर्माण होऊ शकतात. नवीन अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 

कुंभ: साठवलेल्या पैशांमधून विनाकारण खर्च होणार नाही याची काळजी घ्या. तुम्हाला उत्पन्न वाढवण्याच्या काही चांगल्या संधीही मिळू शकतात. ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्या. विद्यार्थ्यांना करिअरमध्ये यश मिळेल.

मीन: स्वतःवर विश्वास ठेवा.अधिक नफा मिळविण्यासाठी व्यवसायात कुटुंबाचं सहकार्य मिळेल. मित्रांच्या मदतीने अवघड कामे सहज पूर्ण होतील.