Horoscope 05 October 2021 | या 4 राशींच्या लोकांच्या जीवनात तणाव निर्माण होणार, वाचा राशीभविष्य

मंगळवारी (Horoscope  05 October 2021)  एकूण 4 राशींच्या लोकांचं आरोग्य बिघडू शकतं, ज्यामुळे अस्वस्थता जाणवेल.

Updated: Oct 4, 2021, 11:01 PM IST
Horoscope  05 October 2021 | या 4 राशींच्या लोकांच्या जीवनात तणाव निर्माण होणार, वाचा राशीभविष्य title=

मुंबई : आज मंगळवारी (Horoscope  05 October 2021) मेष, कर्कसह एकूण 4 राशींच्या लोकांचं आरोग्य बिघडू शकतं, ज्यामुळे अस्वस्थता जाणवेल. नोकरदार वर्गाला कार्यालयातील अडचणींमुळे समस्यांचा सामना करावा लागेल. मात्र धनलाभ होण्याची शक्यता आहे. एस्ट्रो गुरु बेजान दारुवाला यांचे पुत्र चिराग दारुवाला यांच्याकडून जाणून घेऊयात कसा असेल आजचा दिवस. (horoscope tuesday 5 october 2021 see astrology prediction your aries taurus gemini Cancer leo vigro Libra Scorpio zodiac) 

मेष (Aries) : मंगळवारी तुम्हाला अस्वस्थता जाणवेल. तुमचं खराब आरोग्य तुमच्या अस्वस्थतेचे कारण असेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात गुंतणार नाही. नोकरदार वर्गाला कार्यालयात येणाऱ्या अडथळ्यांमुळे त्रास होईल. व्यापारी वर्गासाठी गोष्टी थोड्या सामान्य राहतील.

वृषभ (Taurus) : कार्यक्षेत्रात मंगळवार लाभदायक सिद्ध होईल. तुम्ही सर्वांसोबत चांगल्याशी वागाल. व्यवसायात नफा होईल. लोकांकडून सन्मान मिळेल. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक होईल, पदोन्नती देखील होऊ शकते.

मिथुन (Gemini) : मंगळवार आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा असेल. आज तुम्ही तुमच्या जुन्या मित्राशी संवाद होईल. मन प्रसन्न राहील. शिक्षण आणि स्पर्धा क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांकडून सर्व शक्य सहाय्य उपलब्ध असेल.
 
कर्क (Cacer) : आरोग्य बिघडू शकतं, ज्यामुळे संपूर्ण दिवस अस्वस्थतेतच जाईल. कामात एखाद्याचा पाठिंबा लाभेल त्यामुळे उत्साहीपणा जाणवेल. इतरांना मदत करण्यासाठी पुढे सरसावाल. 

सिंह (LEO) : भाग्य पूर्णपणे तुमच्यासोबत नसेल. पण न्यायालयासंबंधीत बाबीतून तुम्हाला दिलासा मिळेल. कामाच्या ठिकाणी मेहनत, समर्पण आणि आसक्ती स्पष्टपणे दिसेल, ज्यामुळे कार्यक्षेत्रात चांगले यश मिळेल.

कन्या (Virgo) : तुम्हाला कार्यक्षेत्रात चांगलं यश मिळेल. तुमचे पैसे योग्य कामात खर्च होतील. विद्यार्थी परीक्षेत चांगली कामगिरी करतील, परंतु त्यांच्या मनात भीती राहील. शिक्षण घेण्यासाठी मंगळवार चांगला आहे. मेहनतीनुसार तुम्हाला यश मिळेल.
 
तुळ (Libra) : दिवसाची सुरुवात आनंदाने होणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. नोकरीत चांगले आर्थिक लाभ होतील. पदोन्नतीची चिन्हं आहेत. व्यापाऱ्यांना फायद्याची परिस्थिती आहे. दिवसभर चपळतेने प्रत्येक कामं अगदी सहज पूर्ण कराल.

वृश्चिक (Scorpio) : तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यवसायासाठी मंगळवार चांगला राहील. दिवसाची सुरुवात चांगली होईल. भावंड आणि मित्रांसोबत जास्त वेळ घालवाल.

धनु (Sagittarus) : संपूर्ण दिवस उत्साहाने भरलेला असेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल. कामात तुम्हाला चांगले पैसे मिळतील. तुमची आर्थिक बाजू मजबूत असेल. दिवस चांगला जाईल. भाग्य तुम्हाला साथ देईल.

मकर (Capricorn) : कामाच्या ठिकाणी प्रत्येकाशी चांगले वागाल. सहकाऱ्यांची वेळोवेळी साथ मिळेल. चांगले पैसे कमवू शकाल. कौटुंबिक सुख प्राप्त होईल. पाल्यांकडे लक्ष द्या.

कुंभ (Aquarius) : कुटुंबाची काळजी घ्याल. त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबातील सदस्यांसाठी व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढाल.  त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवाल. मित्र तुम्हाला आर्थिक मदत करण्यास मदत करतील.

मीन (Pisces) : नशीब खूप साथ देणार आहे. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नफ्याची स्थिती राहील. कुटुंबात एक प्रकारचा शुभ कार्यक्रम होईल, तुम्ही त्यात सहभागी व्हाल. संपूर्ण दिवस मजेत जाईल.