मुंबई : महाशिवरात्री हा हिंदुसाठी मोठा सण आहे. पूर्ण भारतात हा मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. या दिवशी शिवभक्त देवाला प्रसन्न करण्यासाठी उपवास धरतात.
या दिवशी भक्त शिवलिंगवर जल आणि दुधाने अभिषेक करतात. या दिवशी शिव आणि देवी पार्वती यांच्या शुभ-विवाह झाला होता. शिवरात्री भारतासह इतर अनेक देशांमध्ये देखील साजरा केला जातो.
हिंदू पंचांगानुसार या दिवशी श्रद्धाळू गंगास्नान किंवा इतर नद्यांमध्ये स्नान करतात. यानंतर शंकर भगवानची मनोभावी पूजा करतात. शिवलिंगावर दूधाभिषेक, जलाभिषेक, बेल-पत्र, धोतरा, पुष्प आणि अन्य फूलासंह मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवला जातो.
महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक महिला आपल्या पतीच्या लांब आयुष्यासाठी प्रार्थना करतात. या दिवशी महिला सकाळी लवकर उठून भगवान शिवाची पूजा-अर्चना करतात. शिवलिंगावर जलाभिषेक करतात. शिवलिंगाला चंदन, फळ-फूल चढवतात.
या दिवशी दूध, बदाम आणि भांग यांचं एकत्र मिश्रण करुन ते प्रसादाच्या रुपात दिलं जातं. मध्यरात्री संपन्न केला जाणारा शिव-पार्वतीचा विवाह या दिवशी खूप महत्त्वाचा मानला जातो. जे संपूर्ण वैदिक पद्धतीने केले जातात.
यासोबतच महाशिवरात्रीच्या पुढच्या दिवशी सकाळी उपवास करणारे लोकं मंदिरात जावून विधीपूर्ण शिवलिंगाची पूजा करतात आणि पारायण करतात.