Intimate scene : नवीन सिनेमा रिलीज झाला की, आपण तो पाहायला जातो. अनेकदा आपण कुटुंबासोबत सिनेमा (Movie) पाहतो. थिएटरमध्ये सिनेमा पहायला जमलं नाही तर आपण घरीच आपल्या कुटुंबासोबत सिनेमा पाहतो. अनेकदा सिनेमा पाहताना, तरूण मंडळींची तारांबळ उडते. याचं कारण म्हणजे सिनेमा सुरु असताना एकादा इंटीमेट सीन (Intimate scene) समोर येतो. अशावेळी नेमकी घरच्यांसमोर काय रिएक्शन (Reaction) द्यावी, असा प्रश्नही आपल्या समोर असतो.
आमज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, कुटुंबासोबत सिनेमा पाहत असताना असे सीन समोर आले की, कोणत्या राशीच्या व्यक्ती कशा प्रकारे रिएक्शन देतात किंवा वागतात.
मेष
शक्यतो या राशीच्या व्यक्ती पळ काढण्याचा प्रयत्न करतात. मला काही काम आहे, किंवा फोन आलाय असं सांगून या व्यक्ती निघून जातात
वृषभ
अरे देवा...हा असा काय सीन आला, अशी रिएक्शन या राशीच्या व्यक्तींची असते.
मिथुन
कुटुंबासमोर या राशीच्या व्यक्ती हा सीन आवडला असल्याचं दाखवतात. तसंच हे फार विचित्र असल्याचं ते म्हणतात.
कर्क
या राशीच्या व्यक्तीही पळ काढण्याचा प्रयत्न करतात. कोणाला खाण्यासाठी काही हवंय का, असं म्हणून जागेवरून निघून जातात.
सिंह
या राशीच्या व्यक्ती आपल्याला याबाबत काही माहिती नसल्याचं दर्शवतात. जणू त्यांनी ही गोष्ट पहिल्यांदा पाहिली असल्यासारखं ते वागतात.
कन्या
या व्यक्ती मनातून खजील होतात. हा सीन आता का आला, असं त्यांना मनात वाटू लागतं.
तूळ
या राशीच्या व्यक्ती हुशार असून इंटीमेट सीनची वेळ बघून ठेवतात. कुटुंबासोबत नसताना हा सीन पाहणार असल्याचं त्यांच्या मनात असतं.
वृश्चिक
या राशीच्या व्यक्ती थोड्या लाजतात. असा सीन सुरु झाला की, रिमोट शोधून चॅनल बदलायचा प्रयत्न करतात.
धनू
या लोकांना कुटुंबासोबत असे सीन पाहायला आवडत नाही. असा सीन सुरु झाला की, तो कधी संपतो असा ते विचार करतात.
मकर
या राशीच्या व्यक्ती हा सीन पाहून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात.
कुंभ
हा सीन जबरदस्त आहे, असा विचार हे व्यक्ती करतात.
मीन
या राशीच्या व्यक्ती असा आव आणतात, की त्यांना काहीच माहिती नाही.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)