Jupiter Vakri In Aries : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह कालांतराने एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात. यावेळी अनेक राजयोग तयार करतात. ग्रहांच्या या राशी बदलाचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. यावेळी काही राशींना याचे शुभ परिणाम मिळतात. तर काही राशांनी नकारात्मक परिणाम दिसून येतात.
समृद्धीचा कारक गुरु ग्रह सप्टेंबरमध्ये वक्री चाल चालणार आहे. गुरुच्या या वक्री चालीमुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणार आहे. दरम्यान या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांना याचा चांगला लाभ मिळू शकणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत?
गुरु वक्रीमुळे तयार होणारा मध्य त्रिकोण राजयोग तुमच्यासाठी शुभ सिद्ध होणार आहे. बृहस्पति तुमच्या राशीत वक्री जाणार आहे. यावेळी तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. नोकरदार लोकांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होणार आहे. पद आणि प्रभावात चांगली वाढ होणार आहे. नोकरी-व्यवसायाच्या संदर्भात प्रवास देखील करू शकता. जुनाट आजारांपासून मुक्ती मिळू शकणार आहे.
केंद्र त्रिकोण राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. गुरु ग्रह तुमच्या राशीतून पाचव्या भावात मागे जाणार आहे. या काळात तुम्हाला मालमत्तेचं सुख मिळणार आहे. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. नोकरदार लोकांना चांगल्या संधी मिळतील. अचानक आर्थिक लाभही मिळू शकतो. प्रेम जीवनातील समस्या कमी होऊ शकतात.
केंद्र त्रिकोण राजयोगामुळे या राशींच्या व्यक्तींना सकारात्मक परिणाम मिळणार आहे. यावेळी तुम्हाला कोर्टाच्या प्रकरणांमध्ये यश मिळू शकणार आहे. नशीब तुमच्या सोबत असून तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुमचे मन धर्माच्या कामात गुंतलं जाईल. नोकरदार लोकांना या काळात बढती मिळू शकते. तसंच या काळात तुमच्याकडून केले जाणारे प्रयत्न यशस्वी होणार आहेत.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )