Kendra Trikon Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नऊ ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा कुंडलीतील त्यांची स्थिती अतिशय महत्त्वाची ठरते. कुंडलीतील कुठल्या घरात कुठल्या राशीसोबत कुठला ग्रह आहे. यावर जाचकाचं आयुष्यातील घडामोडी ठरतात. आर्थिक स्थितीपासून वैवाहिक जीवनापर्यंत सगळ्या गोष्टींवर त्याचा परिणाम होतो. कुंडलीतील ग्रहांची स्थिती ही जाचकाला आर्थिकदृष्ट्या श्रीमंत बनवते तर कोणाला आर्थिक संकटात ढकलते. (Kendra Trikona Yoga shani benefits in horoscope according to astrology)
मंगळाचे सिंह (Mars Transit To Leo Zodiac) राशीत संक्रमण झालंय. दुसरीकडे याच राशीत आधीपासून शुक्र विराजमान आहे. अशा वेळी दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे केंद्रस्थानी त्रिकोणी राजयोग तयार झाला आहे. खरं तर 100 वर्षांनंतर चार शुभ योग जुळून आले आहेत. बुधादित्य राजयोग (Budhaditya Rajyog), शश महापुरुष राजयोग (Shash Yog mahapurush rajyog ), केंद्र त्रिकोण राजयोग (Kendra Trikon Rajyog ) आणि शनि-मंगळ-शनिमुळे समसप्त राजयोग (Samsaptak Yog) तयार झाला आहे. या चार महाराजयोगमुळे काही राशींचं नशिब सूर्यासारखे चमकणार आहे.
या राशीच्या कुंडलीत बुधादित्य राजयोग निर्माण झाला आहे. या राजयोगामुळे इतक्या दिवसांपासून करत असलेल्या मेहनतीचं फळं मिळणार आहे. उत्पन्नात घशघशीत वाढ होणार आहे. कामानिमित्त तुम्हाला या काळात बाहेरगावी जावं लागू शकतं. तुमच्या वाणीने लोक प्रभावित होणार आहे. तुमच्या कामाचं या दिवसांमध्ये कौतुक होणार आहे. या राजयोगामुळे आनंदी वातावरण असणार आहे.
या राशीच्या कुंडलीत बुधादित्य राजयोग जुळून आला आहे. या राशीला शश, केंद्र त्रिकोण राजयोग आणि समसप्तक राजयोगाचाही लाभ मिळणार आहे. मालमत्ता किंवा जमिनीसंदर्भातील प्रश्न मार्गी लागणार आहेत. भौतिक सुख या दिवसांमध्ये वाढणार आहे. कमी मेहनत करुनही हातात भरपूर पैसा लाभणार आहे.
या राशीच्या लोकांच्या कुंडलीत बुधादित्य राजयोगसोबतच शश, समसप्तक आणि केंद्र त्रिकोण योग तयार होणार आहे. या महाराजयोगाचा त्यांना विशेष लाभ होणार आहे. इतक्या दिवसांपासून रखडलेली कामं सहज मार्गी लागणार आहेत. कोर्टकचेरीमधील प्रकरण तुमच्या बाजूने लागणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. अचानक अनेक मार्गाने यांना पैसा मिळणार आहे. आर्थिकस्थिती मजबूत झाल्यामुळे घरात आनंदी वातावरण असणार आहे.