आजचे राशीभविष्य | १८ नोव्हेंबर २०१९ | सोमवार

कसा आहे तुमचा आजचा दिवस?

Updated: Nov 18, 2019, 08:06 AM IST
आजचे राशीभविष्य | १८ नोव्हेंबर २०१९ | सोमवार

मेष - जवळपासच्या लोकांमुळे चिडचिड होण्याची शक्यता आहे. एकांतात राहण्याचा प्रयत्न करा. आराम करण्याची गरज आहे. इतरांशी वाद घालू नका. सकारात्मक राहा.

वृषभ - कामं वेळेत पूर्ण होतील. अधिक मेहनत करावी लागू शकते. महत्त्वपूर्ण गोष्टींवर नवीन योजना आखू शकता. दिवस ठिक आहे. विचाराधिन असलेली कामं पूर्ण होऊ शकतात.

मिथुन - स्वत:कडे लक्ष देण्याची गरज आहे. समस्या सुटू शकतात. विचार करुनच पुढे जा. पैसे जपून खर्च करा. लोकांचं तुमच्याकडे लक्ष राहील. कोणताही निर्णय घेताना विचार करा, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. 

कर्क - जुन्या गोष्टी डोकं वर काढू शकतात. समस्या वाढू शकतात. परंतु त्यात चांगलं शोधण्याचा प्रयत्न केल्यास फायदा होईल. धीर ठेवा. मनातील गोष्ट कोणाशीही शेअर करु नका. 

सिंह - कामात मन लागणार नाही. नुकसान होऊ शकतं. मोठा निर्णय घेताना त्रास होऊ शकतो. जवळपासच्या लोकांमुळेही त्रास होण्याची शक्यता आहे.

कन्या - आनंदी वाटेल. इतरांनी दिलेल्या सल्ल्यांचा फायदा होऊ शकतो. पुढे जाण्याच्या नव्या संधी मिळू शकतात.  तब्येतीची काळजी घ्या.

तुळ - अस्वस्थता जाणवेल. अधिक विचार करु नका. महत्त्वाच्या कामांकडे लक्ष द्या. विचार करुनच बोला. कामात मन लागत नसल्यास अधिक ताण घेऊ नका. आराम करा.

वृश्चिक - काही गोष्टी मिळवणं कठिण वाटू शकतं. दिवस सामान्य आहे. येणाऱ्या दिवसांची चिंता राहील. व्यवहारात सावध राहा. जुन्या गोष्टींवर विचार करु नका. 

धनु - नवीन गोष्टी करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. पुढील योजना आखण्यासाठी दिवस चांगला आहे. तुमच्या इच्छेनुसार कामं करा. महत्त्वाचं काम करण्याकडे तुमचं लक्ष राहील. 

मकर - इतरांची मदत होऊ शकते. मित्रांसोबत वेळ घालवू शकता. नवीन कामाची सुरुवात करु शकता. 

  

कुंभ - महत्त्वाची कामं पूर्ण होतील. महत्त्वाच्या काात इतरांची मदत होऊ शकते. दिवस ठिक आहे. विचार केलेली कामं पूर्ण कराल.

मीन - एखाद्या व्यक्तीची भेट नवीन प्रेमसंबंधांची सुरुवात ठरु शकते. मित्र, कुटुंबासोबत वेळ घालवाल. अचानक लहान-मोठा फायदा होऊ शकतो. पैशांबाबत चिंता राहील.