Lakshmipujan diwali 2022: या वस्तूंशिवाय लक्ष्मीपूजन अपूर्ण..आवर्जून वापरा..होईल देवी लक्ष्मीची कृपा

  दिवाळी संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते (diwali 2022). घराघरात एकच जल्लोष दिसून येतो. सगळीकडे सध्या दिवाळीचा माहौल आहे घराघरात सजावट झाली असेल, रांगोळी फराळ या सर्वानी घर सजली असतील. लहान मोठे सगळेच खूप आनंदी असतात. 

Updated: Oct 23, 2022, 06:10 PM IST
Lakshmipujan diwali 2022: या वस्तूंशिवाय लक्ष्मीपूजन अपूर्ण..आवर्जून वापरा..होईल देवी लक्ष्मीची कृपा   title=

Lakshmipujan diwali 2022:  दिवाळी संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते (diwali 2022). घराघरात एकच जल्लोष दिसून येतो. सगळीकडे सध्या दिवाळीचा माहौल आहे घराघरात सजावट झाली असेल, रांगोळी फराळ या सर्वानी घर सजली असतील. लहान मोठे सगळेच खूप आनंदी असतात. 

आणखी वाचा: अशी ओळखा भेसळयुक्त मिठाई..

 

दिवाळीच्या दिवशी श्री गणेशाची आणि माता लक्ष्मीची पूजा करणं अतिशय शुभ मानलं जात (lord ganesha and Lakshmi Pujan). पण हि पूजा करताना काही गोष्टींची काळजी घेणं खूप महत्वाचं असत. बऱ्याचवेळा पूजा सुरु केल्यांनतर काही सामान नसल्याचं काळात आणि मग आपली तारांबळ होते त्यामुळे ऐन पूजेत विघ्न नको म्हणून आधीच सामान आणून ठेवणं महत्वाचं आहे.  (Lakshmipujan diwali 2022 this diwali do Lakshmipujan with this ingredients )

आणखी वाचा: Diwali 2022: नरक चतुर्दशीला करा हे काम घरात होईल भरभराट.. होतील सर्व इच्छा पूर्ण

लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती (lord ganesha goddess luxshmi idol puja)
दिवाळीच्या पूजेच्या वेळी घरात लक्ष्मी आणि गणेशाच्या नवीन मूर्ती खरेदी केल्या जातात. म्हणूनच दिवाळीला लक्ष्मी आणि गणेशाच्या नवीन मूर्ती खरेदी कराव्यात हे अतिशय शुभ मानलं जात

देवीसाठी लाल वस्त्र आणि कमळ खरेदी करा (red vastra and lotus flower )
देवी लक्ष्मीला लाल कमळाचं फुल अति प्रिय आहे म्हणून दिवाळीत पूजेसाठी लाल कमळाचं फुल नक्की वापर करा.याचसोबत देवीच्या पूजेसाठी लाल रंगाचे  कापड नक्की खरेदी करावे . ज्या ठिकाणी पूजा करणार आहेत तिकडे लाल रंगाचं कापड अंथरून त्यावर गणेश आणि माता लक्ष्मी यांची मूर्ती स्थापित करून पूजा करावी. 

आणखी वाचा: नरक चतुर्दशीला चुकूनही करू नका ही काम..वर्षभर करावा लागेल पच्छाताप

पंचामृत तयारी (panchamrut and prasad for Lakshmi Puja)
देवीच्या पूजेतही पंचामृत वापरले जाते. दूध, दही, मध, तूप आणि गंगाजल मिसळून पंचामृत बनवले जाते, लक्ष्मीपूजनासाठी पंचामृताच्या सर्व वस्तू अगोदरच खरेदी कराव्यात. पंचामृताशिवाय लक्ष्मीची पूजा अपूर्ण मानली जाते, असे मानले जाते.
त्यामुळे या लक्ष्मीपूजनासाठी सर्व तयारी आधीच करून ठेवा आणि निर्विघपने पूजा करा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवा. (Lakshmipujan diwali 2022 this diwali do Lakshmipujan with this ingredients )