Diwali 2022: दिवाळीला तुम्ही घरी आणलेली मिठाई भेसळयुक्त तर नाही? पाहा कशी ओळखाल

सगळीकडे दिवाळी सणाची धामधूम आहे, घरोघरी फराळ बनला असेल आपल्या जवळच्या व्यक्तींना आणि नातेवाईकांना आपण मिठाई देतो (gifts to relatives this diwali). मिठाईच्या दुकानांमध्ये प्रचंड गर्दी आहे. पण अशा सणासुदीच्याच काळात फसवणुकीचा पेव फुटतो. अनेक मिठाई विक्रेते मिठायांमध्ये भेसळ करून त्या विकतात. (fake mithai this diwali)

Updated: Oct 22, 2022, 04:51 PM IST
Diwali 2022: दिवाळीला तुम्ही घरी आणलेली मिठाई भेसळयुक्त तर नाही? पाहा कशी ओळखाल title=

diwali 2022: सगळीकडे दिवाळी सणाची धामधूम आहे, घरोघरी फराळ बनला असेल आपल्या जवळच्या व्यक्तींना आणि नातेवाईकांना आपण मिठाई देतो (gifts to relatives this diwali). मिठाईच्या दुकानांमध्ये प्रचंड गर्दी आहे. पण अशा सणासुदीच्याच काळात फसवणुकीचा पेव फुटतो. अनेक मिठाई विक्रेते मिठायांमध्ये भेसळ करून त्या विकतात. (fake mithai this diwali)

पण अशा वेळी मग हा प्रश्न पडतो कि, भेसळ विरहित मिठाई ओळखायची कशी ?  तर आता चिंता करू नका  .. ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे.(how to identify fake sweets this diwali 2022)

सणासुदीच्या निमित्तानं मिठाई आणली जाते. मिठाई घेताना फारशी पडताळणी केली जात नाही. त्याचाच गैरफायदा घेऊन भेसळयुक्त मिठाई बाजारात खपवली जाते. त्यामुळे तुम्हीही मिठाई घेत असाल तर सतर्क राहा. दिवाळीत मिठाई खरेदी करत असाल तर सावधान.. तुम्ही खरेदी करत असलेली मिठाई बनावट आणि भेसळयुक्त असू शकते. मिठाई घेताना काय काळजी घ्याल...पाहुयात..

दिवाळी सुरु झालीय, घराघरात फाराळाची लगबग सुरु असताना मुंबई,पुण्यात एफडीएनं धडक कारवाई करत कोट्यवधींची बोगस मिठाई पकडलीय. मुंबईत एफडीएनं वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत केलेल्या धडक कारवाईत 

दरम्यान भेसळयुक्त मिठाई कशी ओळखाल पाहुयात..

खवा थोडासा पाण्यात विरघळून घ्या, त्यात थोडं टिन्क्चर आयोडीन (incture iodine) टाका. निळा रंग आल्यास त्यात भेसळ आहे असं समजा. 

मिठाईवरील चांदीचा वर्ख बोटावर घेऊन चोळा,वर्ख न वितळल्यास तो अॅल्युमिनियमचा असू शकतो. 

मिठाईचे गडद रंग आरोग्यास हानिकारक असतो. शुद्ध तुपात वनस्पती तुपाची भेसळ ओळखण्यासाठी त्याचा वास घ्यावा, शक्यतो पॅक बंद तूप खरेदी करा
त्यामुळे तुम्हीही मिठाई घेत असाल तर सतर्क राहा.