Lal Kitab: आर्थिक अडचणीत लाल किताबमधील तोडगे ठरणार प्रभावी, जाणून घ्या

Lal Kitab Totke: मेहनत करूनही अनेकदा अपेक्षित यश मिळत नाही. यासाठी ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्तानंतर लाल किताबात अनेक प्रभावी तोडगे देण्यात आले आहे.  लाल किताबातील तोडगे ज्योतिषशास्त्रापेक्षा वेगळे आहेत.

Updated: Jan 5, 2023, 05:08 PM IST
Lal Kitab: आर्थिक अडचणीत लाल किताबमधील तोडगे ठरणार प्रभावी, जाणून घ्या title=

Lal Kitab Totke: मेहनत करूनही अनेकदा अपेक्षित यश मिळत नाही. यासाठी ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्तानंतर लाल किताबात अनेक प्रभावी तोडगे देण्यात आले आहे.  लाल किताबातील तोडगे ज्योतिषशास्त्रापेक्षा वेगळे आहेत. या किताबात शेकडो तोडगे सांगण्यात आले आहेत. लाल किताबातील तोडगे सोपे आणि सहज होणारे असल्याने तात्काळ करणं सोपं असतं. खर्चही अत्यल्प असल्याने अनेक जण लाल किताबातील तोडग्याचा वापर करतात. या तोडग्यामुळे यश मिळवण्यात येणारी अडचण दूर करता येते. तुम्हाला मेहनत करूनही यश मिळत नसेल तर लाल किताबानुसार काही उपायांचा अवलंब करू शकता. चला जाणून घेऊयात प्रभावी तोडगे...

-मंगळवारी करा हा उपाय- मेहनत करूनही पदरी अपयश पडत असेल किंवा कामात अडचणी येत असतील तर लाल किताबमधील तोडगे वापरू शकता. मंगळवारी भक्तिभावान देवाची पूजा करा आणि हनुमान चालीसेचं पठण करा.

-तिजोरीत ठेवा लाल कपडा- अनेकदा पैसे कमवूनही घरात पैसा टिकत नाही. त्यामुळे अडचणीच्या काळात पैशांची चणचण जाणवते. यासाठी लाल कपड्यात तांदूळ बांधून तिजोरीत ठेवा. यामुळे खर्च आवाक्यात राहतो आणि पैसा वाढत राहतो. 

-गाय आणि कुत्र्यांना भाकरी द्या- घरातील पहिली भाकरी गाईसाठी आणि शेवटची कुत्र्यासाठी असावी. यामुळे नशिबाची गाडी वेगाने धावते. त्यामुळे गाय आणि कुत्र्यांना न चुकता भाकरी द्या. 

बातमी वाचा- Paush Pournima: देवी लक्ष्मीचा वार आणि पौष पौर्णिमा, या दिवशी करा हे उपाय आणि मिळवा आशीर्वाद

-सूर्यदेवांना अर्घ्य- आयुष्यात अडचणींचा डोंगर उभा असेल तर रोज सकाळी उठून सूर्यदेवांना अर्घ्य द्या. त्यानंतर दुधात गंगाजल टाकून घराच्या मुख्य द्वाराच्या दोन्ही बाजूला शिंपडा. यामुळे घरात सुख शांती नांदते. तसेच आर्थिक अडचण दूर होते. 

-तुळशीला दूध अर्पण करा- गुरुवारी विष्णुंची पूजा केल्यानंतर तुळसीला दूध अर्पण करा. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते. त्याचबरोबर घरातील दारिद्रय नष्ट होतं आणि पैशांचा ओघ सुरु होतो. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)