लक्ष्मीपूजन स्पेशल : शेअर बाजारातला लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त

आज लक्ष्मीपूजनानिमित्त संध्याकाळी ६.३० ते ७.३० या एका तासात मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये मुहूर्ताचे व्यवहार होतील. तत्पूर्वी मुंबई शेअर बाजारात आज लक्ष्मीपूजन करण्यात आलं.

Updated: Oct 19, 2017, 08:09 PM IST
लक्ष्मीपूजन स्पेशल : शेअर बाजारातला लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त title=

मुंबई : आज लक्ष्मीपूजनानिमित्त संध्याकाळी ६.३० ते ७.३० या एका तासात मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये मुहूर्ताचे व्यवहार होतील. तत्पूर्वी मुंबई शेअर बाजारात आज लक्ष्मीपूजन करण्यात आलं.

बँकांना सुटी असली आणि दिवसभर शेअर बाजार बंद असला तरी संध्याकाळी एका तासासाठी बाजार खुला राहतो. गेल्या अनेक वर्षांपासून ही मुहूर्ताच्या व्यवहारांची परंपरा अबाधित आहे.

गेल्या वर्षी ६.०० ते ७.०० या वेळेत शेअर बाजार खुले होते. मात्र मुहूर्ताच्या व्यवहारांमध्ये सेन्सेक्स-निफ्टीमध्ये फारशी वाढ होत नसल्याचं चित्र आहे. 

२००८ चा पाऊणे सहा टक्के वाढीचा अपवाद वगळता मुहूर्ताला बाजार फ्लॅटच राहिल्याचं दिसलंय. गेल्या वर्षी तर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये अल्पशी घसरण झाली होती. यंदा हा ट्रेंड मोडीत काढत यंदा मुहूर्ताच्या ट्रेडिंगला मोठी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय.

लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त

आश्विन अमावास्या प्रदोषकाली असेल त्या दिवशी लक्ष्मी-कुबेर पूजन केले जाते. आज सायंकाळी ६.०८ पासून रात्री ८.५८ पर्यंत प्रदोषकालात लक्ष्मीपूजन करावयाचे आहे. या दिवशी घरासमोर रांगोली काढली जाते. 

याविषयी पुराणात एक कथा आहे. आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र फिरते. आणि आपल्या निवासासाठी जागा शोधू लागते. जिथे स्वच्छता, सौंदर्य, रसिकता, उद्योगप्रियता असेल तिथे ती आकर्षित होते. तसेच ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, धर्मनिष्ठ, संयमी, सदाचारी, क्षमाशील माणसे राहतात तेथे वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते. चांगल्या मार्गाने मिळवलेल्या आणि चांगल्या मार्गाने खर्च होणाऱ्या पैशालाच 'लक्ष्मी' म्हणतात.