Lunar Eclipse 2023 Horoscope : यंदाची शरद पौर्णिमा अतिशय खास आहे. या वर्षाचं शेवटं चंद्रग्रहण 28-29 ऑक्टोबरला असणार आहे. हे चंद्रग्रहण मध्यरात्री 01:06 वाजेपासून 02:22 वाजेपर्यंत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हे चंद्रग्रहण अश्विनी नक्षत्र आणि मेष राशीत होणार आहे. 2023 मध्ये हे एकमेव चंद्रग्रहण आहे, जे भारतात दिसणार आहे. त्यामुळे त्याचा सुतक कालावधी वैध असणार आहे. त्याचा सुतक 28 ऑक्टोबरला दुपारी 02:52 वाजेपासून सुरु होणार आहे. या चंद्रग्रहणाचा सर्व राशींवर परिणाम होणार असून 6 राशींवर त्याचा सर्वाधिक नकारात्मक प्रभाव पडणार आहे. (lunar eclipse Negative impact 6 zodiac signs should be careful on job health and love life chandra grahan)
वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण मेष राशीच्या लोकांसाठी अशुभ असणार आहे. तुमच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनावर याचा नकारात्मक परिणाम होणार आहे. तणावामुळे तुमचं वर्तन बिघडणार आहे. त्यामुळे तुमच्या नातेसंबंधांवर वाईट परिणाम होईल. चंद्रग्रहणाच्या दिवशी तुम्ही कोणतीही गुंतवणूक करु नका. शिवाय नवीन कामही हातात घेऊ नका. हे तुमच्यासाठी हानिकारक होईल. त्याच्यासोबत आरोग्याची काळजी घ्या.
चंद्रग्रहणाच्या दिवशी तुमच्या जीवनात तणाव घेऊन येणार आहे. ज्योतिषशास्त्रात चंद्राला मनाचा कारक मानलं जातं. चंद्रामुळे तुमचं मन अस्वस्थ होणार आहे. त्या दिवशी तुमचा खर्चही भरमसाठ वाढणार आहे. फालतू खर्च टाळा अन्यथा तुमच्यावर आर्थिक संकट कोसळेल.
तुमच्या राशीचा अधिपती ग्रह चंद्र असल्याने ग्रहणाचा वाईट परिणाम होईल. अशा स्थितीत वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणाच्या दिवशीही तुम्ही विशेष काळजी घ्या. चंद्रग्रहण तुमच्यासाठी अशुभ परिणाम घेऊन येणार आहे. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी सावधपणे काम करावं लागणार आहे. निष्काळजीपणा तुम्हाला महागात पडू शकतो. या दिवशी आरोग्याची काळजी घ्या.
चंद्रग्रहण तुमच्या राशीच्या लोकांसाठी संमिश्र परिणाम घेऊन येणार आहे. एकीकडे तुम्हाला पैसा मिळू शकतो पण खर्चावर नियंत्रण नसल्यामुळे तुम्हाला पैशाची चणचण जाणवणार आहे. जर तुम्ही तुमच्या उधळपट्टीवर नियंत्रण ठेवले नाही तर तुम्हाला इतरांकडून पैसे उसणे घ्यावे लागतील.
वर्षाच्या दुसऱ्या चंद्रग्रहणाच्या दिवशी तुमच्या राशीच्या लोकांनी शत्रूंपासून सावध राहावे लागणार आहे. ते तुमच्यासाठी काही समस्या निर्माण करण्याची भीती आहे. तुम्ही तुमचं काम गोपनीय ठेवावं लागणार आहे. तुमची माहिती लीक होणार नाही याची काळजी घ्या. अन्यथा तिचा गैरवापर होण्याची दाट शक्यता आहे.
चंद्रग्रहण तुमच्या राशीच्या आठव्या घरात होणार आहे. यामुळे तुमच्या प्रेम जीवनात तणाव निर्माण होण्याची भीती आहे. जोडीदाराशी संयम बाळगा आणि तुमच्या नातेसंबंधावर परिणाम होऊ देऊ नका. राग आणि वाणीवर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी योग्य होईल. गोष्टी शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करणे बरं होईल.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.