What Color to Wear on Mahashivratri 2024 : यावर्षी 8 मार्चला महिला दिन आणि महाशिवरात्रीचा उत्साह एकत्र आला आहे. महिला दिनाला जांभळा रंगाचे कपडे परिधान केले जातात. या दिवशी महाशिवरात्रीदेखील असल्याने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पूजेसाठी कुठल्या रंगाचे वस्त्र घालायचे तुम्हाला माहिती आहे का? भगवान महादेवाला बेलपत्र, भस्म, रुद्राक्ष हे प्रिय आहेत. तसंच शंकर देवाला कुठला रंग प्रिय आहे, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. (Mahashivratri 2024 Which color clothes are auspicious and inauspicious to wear on Mahashivratri green color What does the scriptures say)
धार्मिक शास्त्रानुसार कुठलीही पूजा करताना काही नियम सांगण्यात आले आहेत. महाशिवरात्रीला महादेवाला प्रसन्न करण्यासाठी जी पूजा करणार आहात तेव्हा काही चुका करु नका. पूजा करताना कुठे कपडे परिधान करावे याबद्दल शास्त्र काय सांगतं. पूजेच्या वेळी पुरुषांनी धोतर-कुर्ता आणि महिलांनी साडी नेसली पाहिजे. तर कुमारी मुलींनी पंजाबी ड्रेस घालावा.
महाशिवरात्रीला कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावेत? शास्त्रानुसार महादेव शिवाला हिरवा रंग खूप प्रिय आहे. म्हणून तुम्ही महाशिवरात्रीला हिरवे कपडे परिधान करावेत. जर हिरवा रंग शक्य नसेल तर तुम्ही महाशिवरात्रीला लाल, पिवळे, गुलाबी, पांढरे आणि केशरी रंगाचे कपडे परिधान करु शकता.
महाशिवरात्री पूजेच्या वेळी काळ्या रंगाचे कपडे घालण्यास व्रर्ज्य मानले जाते. याशिवाय निळ्या रंगाचे कपडे घालण्यासही मनाई असते. असे म्हणतात की अशा कपड्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा असून हे कपडे अशुभ मानले जातात.
8 मार्च 2024 ला महाशिवरात्रीला निशिता काळात भगवान शिवाची पूजा करणे शुभ मानले जाते. चार प्रहारांमध्ये भगवान शंकराची पूजा केली जाते. पहिला तास सकाळी 6:25 ते रात्री 9:28 पर्यंत असतो. दुसरा तास रात्री 9:28 ते 12:31 पर्यंत आहे. तिसरा तास मध्यरात्री 12 ते पहाटे 3 वाजेपर्यंत असतो. तर चतुर्थ प्रहर ब्रह्म मुहूर्तामध्ये पहाटे 3 ते 6 या वेळेत पूजा असणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)