Mahavir Jayanti 2023 : आज भगवान महावीर जयंती! पूजा आणि शुभ मुहूर्त माहिती आहे का?

Mahavir Jayanti 2023 : सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य शिकवण देणाऱ्या भगवान महावीर यांची आज जयंती...खरं तर अनेकांना संभ्रम होता की महावीर जयंती सोमवारी आहे की मंगळवारी...पण उदय तिथीनुसार आज 4 एप्रिल 2023 ला महावीर जयंती साजरी करण्यात येणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Apr 4, 2023, 07:18 AM IST
Mahavir Jayanti 2023 : आज भगवान महावीर जयंती! पूजा आणि शुभ मुहूर्त माहिती आहे का? title=
mahavir jayanti 2023 date perform puja mahavir jayanti 2023 bank holiday in marath

Mahavir Jayanti 2023 : पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशीला महावीर जयंती साजरी केली जाते. त्यामुळे सोमवारी 03 एप्रिलला त्रयोदशी होती. त्यातच त्रयोदशी तिथी सोमवारी 03 एप्रिल सकाळी 6.23 वाजेपासून मंगळवारी 04 एप्रिल 2023 ला सकाळी 08.07 वाजपर्यंत (Mahavir Jayanti 2023 date) आहे. त्यात कॅलेडर आणि बँकला मंगळवारी महावीर जयंतीची सुट्टी (mahavir jayanti 2023 bank holiday) देण्यात आली आहे. त्यामुळे नेमकी कधी आहे महावीर जयंती असा प्रश्न अनेकांना पडला होता. 

हिंदू धर्मानुसार उदय तिथीनुसार सण आणि दिवस साजरे केले जातात. त्यामुळे महावीर जयंतीची उदय तिथी आज मंगळवारी  04 एप्रिल 2023 ला आहे. जैन धर्माचे 24 वे आणि शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज साजरी करण्यात येणार आहे. भगवान महावीरांनी वयाच्या 30 व्या वर्षी त्यांनी राजेशाही थाट सोडून संसाराचा त्याग केला होता. (mahavir jayanti 2023 date perform puja mahavir jayanti 2023 bank holiday in marath)

महावीर जयंती पूजा कशी केली जाते? (Mahavir Jayanti Puja)

या दिवशी भगवान महावीरांच्या मूर्तीला सोन्याच्या किंवा चांदीच्या कलशातून पाणी अपर्ण करण्याची परंपरा आहे. त्यानंतर त्यांचा अभिषेक करुन त्याची विधीवत पूजा केली जाते. यादिवशी त्यांचा पाच तत्त्वांची आणि त्यांची शिकवणाचं स्मरण केलं जातं. 

काय होती भगवान महावीरांची पाच प्रमुख तत्त्वे? (Mahavir ji Five Lessons)

सत्य
अहिंसा
अस्तेय
अपरिग्रह
 ब्रह्मचर्य

सत्य आणि अहिंसा हे माणसाचं पहिलं कर्तव्य असावं असं भगवान महावीर यांनी सांगितलं आहे. तिसर म्हणजे अस्तेय याचा अर्थ चोरी न करणे असा होतो. चौथ म्हणजे अपरिग्रह याचा अर्थ विषय किंवा वस्तूची आसक्ती न राहणे. ज्यामुळे माणूस ऐहित आकर्षणाचा त्याग सहज करु शकतो. शेवटचं आणि पाचव तत्त्व म्हणजे ब्रह्मचर्य. महावीर म्हणतात ब्रह्मचर्य पाळणाऱ्या व्यक्तीला आपल्या इंद्रियांवर सहज नियंत्रण मिळवता येतं. 

महावीर यांच्याबद्दल माहिती

धर्मग्रंथानुसार महावीर यांचा जन्म हा बिहारमधील वैशाली कुंड या गावात झाला. इ.स.पू. 599 मध्ये
लिच्छवी घराण्याचे महाराज सिद्धार्थ आणि राणी त्रिशाला हे त्यांचे आई वडील. बालपणी महावीर यांचं नाव वर्धमान असं होतं. वयाच्या 30 व्या वर्षी वर्धमान यांनी सर्व सुखांचा त्याग केला आणि आध्यात्मिक जीवनात प्रवेश केला. तब्बल 12 वर्षांच्या कठोर तपश्चर्यानंतर त्यांना सर्व इंद्रियांवर विजय मिळवण्यात यश आलं. यानंतर जग त्यांना महावीर या नावाने ओळखायला लागले. 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)