Shash Rajyog: मार्गी शनी बनवणार शश राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस

Saturn Direct 2023: वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये शनिदेवाला खूप महत्त्वाचा ग्रह मानण्यात आला आहे. शनी देव सध्या कुंभ राशीत वक्री अवस्थेत आहेत. शनी देव 4 नोव्हेंबरपासून मार्गी होणार आहेत. यावेळी शनी मार्गी झाल्याने कुंभ राशीत शश राजयोग तयार होणार आहे.

सुरभि जगदीश | Updated: Sep 13, 2023, 06:44 AM IST
Shash Rajyog: मार्गी शनी बनवणार शश राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस title=

Saturn Direct 2023: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनुसार, त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. तर यावेळी काही ग्रह वक्री आणि मार्गी चाल चालतात. वक्री चालीमध्ये ग्रह उलट दिशेने फिरतात. तर जे ग्रह मार्गी होतात ते सरळ चालू लागतात. 

वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये शनिदेवाला खूप महत्त्वाचा ग्रह मानण्यात आला आहे. शनी देव एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागतात. शनी देव सध्या कुंभ राशीत वक्री अवस्थेत आहेत. शनी देव 4 नोव्हेंबरपासून मार्गी होणार आहेत. यावेळी शनी मार्गी झाल्याने कुंभ राशीत शश राजयोग तयार होणार आहे. दरम्यान या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना चांगला फायदा होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. 

कुंभ रास

शनीच्या मार्गी अवस्थेमुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस येणार आहेत. यावेळी या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढवेल. उच्च पदावरील लोकांशी तुमचे संबंध वाढतील. तुम्हाला तुमच्या लाइफ पार्टनरची साथ मिळेल. आर्थिक लाभ होईल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकतात. विवाहित लोकांच्या जीवनात गोडवा येणार आहे. 

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी शनीची मार्गी अवस्था खूप लाभदायक ठरणर आहे. शश राजयोग या लोकांचं भाग्य उघडेल. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती कराल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये सुवर्ण संधी मिळतील. या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तार होणार आहे. यावेळी तुम्हाला अपघाती पैसे मिळू शकतात. 

सिंह रास

शनीच्या मार्गी हालचालीमुळे तयार झालेला शाश राजयोग सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या जीवनात आनंद वाढणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. पती-पत्नीचे नाते घट्ट होणार आहे. भौतिक सुखात वाढ होईल. कोणत्याही वादग्रस्त प्रकरणात यश मिळेल. विवाहित लोकांच्या जीवनात आनंद राहील. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )