Mangal-Ketu Yuti: मंगळ-केतूने बनवला विध्वंसक योग; पाहा तुमच्या राशीवर कसा होणार परिणाम

Mars And Ketu Conjunction: मंगळने 2 ऑक्टोबर रोजी तूळ राशीत प्रवेश केलाय. दरम्यान यावेळी केतू ग्रह आधीच उपस्थित आहे. त्यामुळे तूळ राशीमध्ये मंगळ आणि केतू यांचा संयोग निर्णाम होणार आहे. या युतीमुळे धोकादायक संयोग तयार झाला आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Oct 6, 2023, 07:50 AM IST
Mangal-Ketu Yuti: मंगळ-केतूने बनवला विध्वंसक योग; पाहा तुमच्या राशीवर कसा होणार परिणाम title=

Mars And Ketu Conjunction: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी नुकतंच ग्रहांचा सेनापती मंगळने 2 ऑक्टोबर रोजी तूळ राशीत प्रवेश केलाय. दरम्यान यावेळी केतू ग्रह आधीच उपस्थित आहे. त्यामुळे तूळ राशीमध्ये मंगळ आणि केतू यांचा संयोग निर्णाम होणार आहे. या युतीमुळे धोकादायक संयोग तयार झाला आहे. 

मंगळ-केतू सुद्धा शनिसोबत त्रिकोण बनवणार आहेत. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, राहू आणि केतूचं राशी आणि नक्षत्रात होणारे गोचर नकारात्मक घटनांचं भाकीत करतं. राहू आणि केतू नेहमी विरुद्ध दिशेने प्रवास करतात. तसेच, केतू ग्रहाचे स्वरूप मंगळासारखे आहे. त्यामुळे ज्यावेळी या दोन ग्रहांची युती होतो तेव्हा ते धोकादायक मानले जाते.

जाणून घेऊया याचा राशींवर कसा पडणार प्रभाव

मेष

तुम्हाला यावेळी काही चढ-उतार पहावे लागणार आहेत. तुमच्या जोडीदारासोबत काही मतभेद होऊ शकतात. अतिरिक्त राग देखील येण्याची शक्यता आहे.

वृषभ

या राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. कोर्टाच्या प्रकरणांमध्ये तुम्हाला अपयशाला सामोरे जावे लागू शकते. तसेच या काळात शेअर बाजार, बेटिंग आणि लॉटरीपासून दूर राहा.

मिथुन 

पोटाशी संबंधित समस्या असू शकतात. त्यामुळे खाण्याच्या सवयींची काळजी घ्या.

कर्क 

आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी. तुम्हाला खोकला, घसा किंवा नाकाचे आजार असतील तर काळजी घ्या.

सिंह

नशीब तुम्हाला साथ देईल. यावेळी जे काही काम हाती घ्याल ते पूर्ण कराल. तिथे तुमचा आत्मविश्वास वाढेल.

कन्या

या राशीच्या लोकांना यावेळी आर्थिक नुकसान होऊ शकते. जुने आजार उद्भवू शकतात. 

तूळ

यावेळी अनावश्यक धावपळ होऊ शकते. तुम्हाला प्रवासही करावा लागू शकतो. तुमच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.  नोकरी-व्यवसायात बदल टाळा.

वृश्चिक 

तुम्ही लोकांनी यावेळी आरोग्याची काळजी घ्यावी. इजा आणि अपघात होण्याची शक्यता असते. 

धनु

या राशीच्या लोकांसाठी मंगळ आणि केतूची युती उत्पन्नाच्या दृष्टीने चांगली आहे. यावेळी तुम्ही नवीन काम सुरू करू शकता. नवी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. 

मकर

मंगळ आणि केतूची युती तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. यावेळी आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. 

कुंभ 

मंगळ आणि केतू यांच्या संयोगाने तुम्ही खूप प्रवास करू शकता. तुम्ही धार्मिक प्रवासाला जाऊ शकता. 

मीन

या काळात आरोग्याची काळजी घ्यावी. आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे गुंतवणूक करू नका. पैसे उधार देऊ नका. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )