Mangal And Ketu Conjunction : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या गोचर म्हणजे संक्रमणामुळे मानवी जीवनावर परिणाम होणार आहे. ग्रहांच्या या स्थितीचा परिणाम देश आणि जगावरही पडतो, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत. खरं तर 9 ग्रह आपल्या ठराविक वेळेनुसार 12 राशीतून भ्रमण करत असतो. यातून एखाद्या राशीत दोन, तीन किंवा त्यापेक्षा जास्त ग्रहाचं मिलन होतं. त्यातून शुभ अशुभ योग निर्माण होत असतात. नुकताच गेल्या महिन्यात तूळ राशीत मंगळ आणि केतू ग्रहाचं 5 वर्षांनी युती झाली आहे. या मिलनातून 3 राशीच्या लोकांचं भाग्य उजळून निघणार आहे. (Mars Ketu Conjunction in tula after 5 years There will be a huge increase in the wealth of these zodiac sign people)
मंगश आणि केतूचा संयोगामुळे तुमच्यासाठी अनेक शुभ गोष्टी घेऊन आला आहे. या राशीच्या चौथ्या भावात हे मिलन निर्माण झालं आहे. त्यामुळे तुम्हाला वाहन आणि मालमत्ता खरेदी करण्याचे योग वाढले आहेत. तुम्हाला व्यवसायातून मोठ्या फायदा होणार आहे. हा योग तुम्हाला अतिशय लाभदायक ठरणार आहे. तुम्हाला चांगला नफासोबत यशाचं गणित गवसणार आहे. आईरुपी मातेचं तुम्हाला सहकार्य लाभणार आहे.
ग्रहांचा सेनापती मंगळ आणि छाया ग्रह केतू यांच्यामुळे तुम्हाला लाभ होणार आहे. हा संयोग तुमच्या कुंडलीतील उत्पन्नाच्या घरात निर्माण झाला आहे. त्यामुळे तुमचं बँक बॅलेन्स दिवसागणित वाढणार आहे. तुम्हाला एक स्त्रोतांतून पैशांचा ओघ वाढणार आहे. तुमच्या योजना या काळात यशस्वी होणार आहे. मित्र आणि कुटुंबियांकडून तुम्हाला सहकार्य लाभणार आहे. हा काळ गुंतवणुकीसाठी फायदेशीर आहे. व्यापारी कोणताही व्यवसाय हात घातला तरी त्यातून तुम्हाला फायदा होणार आहे. शेअर बाजार, सट्टाबाजी आणि लॉटरीतून तुम्हाला फायदा होणार आहे.
मंगळ आणि केतू संयोग तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. हा संयोग तुमच्या राशीच्या भाग्यस्थानी निर्माण होणार आहे. तुम्हाला नशीबाची पूर्णपणे साथ मिळणार आहे. करिअरमध्ये उत्तम संधी आणि प्रगती घेऊन येणार आहे. तुमच्या करिअरमध्ये या संयोगाचा शुभ प्रभाव पाहिला मिळणार आहे. तुमच्या कामात नशिबाची साथ प्राप्त होणार आहे. नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवासदेखील सुखकर ठरणार आहे. परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याची तुमची इच्छा पूर्ण होणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)