Lunar Eclipse 2023 : दसऱ्यानंतर या वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण आहे. शरद पौर्णिमेला म्हणजे 28 ऑक्टोबरला चंद्रग्रहण असणार आहे. पंचांगानुसार हे ग्रहण पहाटे 1.05 वाजता सुरु होणार असून पहाटे 2.25 वाजेपर्यंत असणार आहे. या वर्षातील चार ग्रहणापैकी हे एकमेव चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. चंद्रग्रहणाचा सुतक काळ हा 9 तास आधी सुरु होतो. त्यामुळे 28 ऑक्टोबरला दुपारी 4.05 वाजेपर्यंत असणार आहे. चंद्रग्रहण काही राशींसाठी घातक तर काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. (The last lunar eclipse after Dussehra will make these zodiac signs rich Diwali will be happy chandra grahan 2023)
या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण या राशीच्या लोकांना लाभदायक ठरणार आहे. या लोकांना मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार आहे. त्यामुळे त्यांच्या संपत्तीत घशघशीत वाढ होणार आहे. रोजगाराच्या नवीन संधी उपलबद्ध होणार आहे. चंद्रग्रहणाचा शुभ परिणामामुळे या राशींची दिवाळी आनंदमय असणार आहे.
कर्क राशीच्या लोकांसाठी या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण वरदान ठरणार आहे. चंद्रदेव तुमच्या दारात सुख आणि समृद्धी घेऊन येणार आहे. त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. मुलांबद्दल तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे. गाडी खरेदीची योग तुमच्या कुंडलीत जुळून आले आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर घरात गाडी येऊ शकते.
या वर्षांतील शेवटचं चंद्रग्रहण या राशीच्या आयुष्यातील सगळं संकट नाहीसे होणार आहे. चंद्रग्रहणामुळे तुमच्या आयुष्यात आनंद निर्माण होणार आहे. अचानक तुम्हाला धनलाभ होईल. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे.
कुंभ राशीसाठी चंद्रग्रहण आनंद घेऊन आला आहे. चंद्रदेव या राशीच्या लोकांवर धनवर्षाव करणार आहे. अडकलेले पैसे या लोकांना परत मिळणार आहे. त्यामुळे यांची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद असणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)