Panchang 28 October 2024 in marathi : आली आली दिवाळी आली...आज दिवाळी पहिला दिवस वसुबारस आहे. त्यासोबत शुभ संयोग म्हणजे रमा एकादशीचं व्रत आहे. आज गाय वासराची पूजा केली जाते. जाणून घ्या वसुबारस पूजेचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी...
आज पंचांगानुसार (Panchang Today) गजकेसरी योग, ब्रह्मयोग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. चंद्र आज सिंह राशीत भ्रमण करत आहे. (monday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. सोमवार हा दिवस भगवान शंकराला समर्पित आहे. आज महादेवासोबत एकादशी असल्याने भगवान विष्णुची पूजा करण्यात येणार आहे. अशा या सोमवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (monday panchang 28 october 2024 Rama Ekadashi and Vasubaras panchang in marathi diwali 2024 )
वार - सोमवार
तिथी - एकादशी - 07:53:22 पर्यंत
नक्षत्र - पूर्व फाल्गुनी - 15:24:19 पर्यंत
करण - बालव - 07:53:22 पर्यंत, कौलव - 21:12:44 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - ब्रह्म - 06:46:01 पर्यंत
आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला वसुबारस साजरी करण्यात येते. पंचांगानुसार द्वादशीची तिथी 28 ऑक्टोबर 2024 संध्याकाळी 7.35 मिनिटांपासून 29 ऑक्टोबर संध्याकाळी 5.04 मिनिटांपर्यंत असणार आहे.
गोवत्स द्वादशीचा मुहूर्त हा सायंकाळी 05.31 मिनिटे ते 08.09 मिनिटांपर्यंत आहे. पूजा करताना गाय आणि वासराची पूजा केली जाते. विशेष महत्त्व असून या दिवशी उपवास केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते.
सूर्योदय - 06:30:35
सूर्यास्त - 17:38:48
चंद्र रास - सिंह - 22:11:16 पर्यंत
चंद्रोदय - 27:36:00
चंद्रास्त - 15:31:00
ऋतु - हेमंत
शक संवत - 1946 क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 11:08:12
महिना अमंत - आश्विन
महिना पूर्णिमंत - कार्तिक
दुष्टमुहूर्त - 12:26:58 पासुन 13:11:31 पर्यंत, 14:40:36 पासुन 15:25:09 पर्यंत
कुलिक – 14:40:36 पासुन 15:25:09 पर्यंत
कंटक – 08:44:14 पासुन 09:28:47 पर्यंत
राहु काळ – 07:54:07 पासुन 09:17:39 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 10:13:20 पासुन 10:57:52 पर्यंत
यमघण्ट – 11:42:25 पासुन 12:26:58 पर्यंत
यमगण्ड – 10:41:10 पासुन 12:04:42 पर्यंत
गुलिक काळ – 13:28:13 पासुन 14:51:45 पर्यंत
अभिजीत - 11:42:25 पासुन 12:26:58 पर्यंत
पूर्व
ताराबल
अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद
चंद्रबल
मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.