मुंबई : स्वप्न पहाटे पडले असतील, तर खरे होणार असा अनेकांचा विश्वास आहे. एवढंच नाही काय स्वप्न असतील हे अनेकदा आपल्याला देखील नाहीत. पण असे काही स्वप्न आहेत, जे संकेत असतात आपल्या भरभराटीचे. अनेक वेळा व्यक्तीने पाहिलेली स्वप्ने दिवसभर त्रास देतात, स्वप्नाचा अर्थ काय आहे. स्वप्न शास्त्रानुसार आज आपण त्या स्वप्नांबद्दल जाणून घेणार आहोत, जे भविष्यात लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत देतात.
दात तुटणे आणि मुलांचे हसणे- स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात लहान मुले हसताना किंवा चालताना दिसली तर ती शुभवार्ता मानली जाते. असे मानले जाते की लक्ष्मी घरात प्रवेश करणार आहे. स्वप्नात दात तुटणे देखील शुभ मानले जाते. हे चिन्ह व्यक्तीच्या करिअरमध्ये लवकरच प्रगती होणर असल्याचं आहे.
कपडे शिवताना पाहणे - एखाद्या व्यक्तीला स्वप्नात कपडे शिवताना किंवा स्वतःला कपडे शिवताना पाहिले असेल तर ते धन वाढीचे संकेत मानले जाते. नोकरी शोधणे, एखादी गोष्ट हिसकावून घेणे किंवा एका पळून जाणे हे देखील शुभ संकेत आहेत. याचा अर्थ तुम्हाला धनलाभ होणार आहे.
यशाच्या शिखरावर चढणे किंवा मंदिरात जाणे हे देखील शुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ असा की तुम्ही प्रचंड यश मिळवणार आहात. त्याचबरोबर स्वप्नात पांढऱ्या सापाचा दंश आर्थिक बाबतीतही शुभ मानला जातो.
(वरील माहिती सर्वसामान्य समजुतींवर आधारित आहे, झी 24 तास याची खातरजमा करत नाही)