Papmochani Ekadashi 2023 : पापमोचनी एकादशीला करा 'हे' उपाय, मृत्यूनंतर मिळेल स्वर्ग!

Papmochani Ekadashi 2023 : चैत्र महिन्यातील एकादशी ही पापमोचनी एकादशी म्हणून ओळखली जाते. या एकादशीला 3 अद्भुत योग जुळून आल्यामुळे आजच हे उपाय करा. मृत्यूनंतर स्वर्ग मिळेल, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

Updated: Mar 18, 2023, 07:36 AM IST
 Papmochani Ekadashi 2023 : पापमोचनी एकादशीला करा 'हे' उपाय, मृत्यूनंतर मिळेल स्वर्ग! title=
Papmochani Ekadashi 2023 18 march 2023 donating food and water paap se mukti ke upay in marathi

Papmochani Ekadashi 2023 : पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पापमोचनी एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. त्यामुळे चैत्र महिन्यांतील आज पापमोचनी एकादशी (#Ekadashi)...पापमोचनी एकादशीच्या दिवशी उपवास करुन दान केल्याने जाणून-अजाणतेने केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते अशी हिंदू धर्मात मानता आहे. आज एकादशीला 3 अद्भुत योग जुळून आले आहेत. या शुभ योगात केलेली उपासना अनेक पटींनी अधिक फलदायी ठरणार आहे. (Papmochani Ekadashi 2023 18 march 2023 donating food and water paap se mukti ke upay in marathi )

पापमोचनी एकादशी 2023 मुहूर्त (Papmochani Ekadashi 2023 muhurat)

चैत्र कृष्ण एकादशी तारीख सुरु - 17 मार्च 2023 सकाळी 02.06 पासून

चैत्र कृष्ण एकादशी तिथी समाप्त - 18 मार्च 2023 सकाळी 11.13 पर्यंत 

उपवासाची वेळ - 19 मार्च 2023 सकाळी 06.27 - 08.07 वाजेपर्यंत

पूजा मुहूर्त - सकाळी 07:58  - सकाळी 09:29 वाजेपर्यंत

पापमोचनी एकादशी 2023 शुभ योग (Papmochani Ekadashi 2023 shubh yoga)

द्विपुष्कर योग - सकाळी 12:29 - सकाळी 06:27 (19 मार्च 2023)
सर्वार्थ सिद्धी योग - 18 मार्च सकाळी 06:28 - 19 मार्च सकाळी 12:29
शिवयोग - 17 मार्च सकाळी 03:33 - 18 मार्च रात्री 11:54 वाजेपर्यंत 

एकादशीला हे गोष्टी दान करा!

एकादशीच्या पूजेमुळे घरात सुखसमृद्धी नांदते. अडचणी आणि संकटे दूर होतात आणि अपत्य प्राप्तीसाठी हे व्रत केलं जातं. चैत्र महिन्यात या एकादशीला अन्नपाणी दानाला विशेष महत्त्व आहे. शास्त्रानुसार या दिवशी गरजू लोकांना अन्न आणि पाणी पाजल्याने जाणून-अजाणतपणे केलेली पापे नष्ट होतात. त्यामुळे शुभ तिथीला विष्णू मंदिरात अन्न-धान्यही दान करावे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

मृत्यूनंतर मिळेल स्वर्ग!

आपल्या सर्वांना मृत्यूनंतर स्वर्ग मिळावा अशी इच्छा असते. त्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहे. या दिवशी गायीला चारा दिल्यास अनेकविध शुभ फल मिळतात. पापमोचनी एकादशीचे व्रत करुन विष्णूची करुन गायीचं दान केल्यास विष्णूची विशेष कृपा प्राप्त होते आणि मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त होतो, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)