Pitru Paksha 2022: 12 वर्षानंतर पितृपक्षात विशेष योग! 17 सप्टेंबरला श्राद्ध कर्म करता येणार नाही, कारण...

श्राद्ध पक्षाच्या काळात श्राद्ध-तर्पण, पिंडदान करून पितरांचा आशीर्वाद मिळतो. यामुळे जीवनातील सर्व समस्या दूर होतात.

Updated: Sep 8, 2022, 04:03 PM IST
Pitru Paksha 2022: 12 वर्षानंतर पितृपक्षात विशेष योग! 17 सप्टेंबरला श्राद्ध कर्म करता येणार नाही, कारण... title=

Pitru Paksha 2022: भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रतिपदेपासून पितृपक्ष सुरु होतो. भाद्रपद आमवास्येला सर्वपित्रि अमावास्या असते. यंदा पितृ पंधरवडा 10 सप्टेंबरपासून 25 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. पंधरवड्यात 15 दिवस असले तरी इंग्रजी कॅलेंडरनुसार या वर्षी 16 दिवस येत आहेत. असा योगायोग तब्बल 12 वर्षांनंतर जुळून आला आहे. दरम्यान, 17 सप्टेंबर या दिवशी कोणतेही श्राद्ध कर्म, तर्पण इत्यादी केले जाणार नाहीत.

श्राद्ध पक्षाच्या काळात श्राद्ध-तर्पण, पिंडदान करून पितरांचा आशीर्वाद मिळतो. यामुळे जीवनातील सर्व समस्या दूर होतात. सुख, समृद्धी आणि प्रगती. या दरम्यान गरीब आणि ब्राह्मणांना दान आणि दक्षिणा द्यावी. गणेश विसर्जनानंतर दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष सुरू होईल. 

कोणत्या दिवशी कोणाचे श्राद्ध होईल?

10 सप्टेंबर, प्रतिपदा श्राद्ध - ज्यांचा मृत्यू प्रतिपदेला झाले आहे, त्यांचे श्राद्ध भाद्रपद कृष्ण महिन्याच्या प्रतिपदेला केले जाते.

11 सप्टेंबर, द्वितीयेचे श्राद्ध- ज्या लोकांचा मृत्यू कोणत्याही द्वितीयेला झाला असेल, त्यांचे श्राद्ध या दिवशी केले जाईल.

12 सप्टेंबर, तृतीयेचे श्राद्ध- ज्यांचा मृत्यू तृतीया तिथीला झाला आहे, त्यांचे श्राद्ध या दिवशी केले जाईल.

13 सप्टेंबर, चतुर्थीचे श्राद्ध- ज्या लोकांचा मृत्यू चतुर्थी तिथीला झाला असेल, त्यांचे श्राद्ध या दिवशी केले जाईल.

14 सप्टेंबर, पंचमीचे श्राद्ध - ज्या लोकांचं लग्न झालं नव्हतं आणि ज्यांचा पंचमीच्या दिवशी मृत्यू झाला. त्यांचं श्राद्ध या दिवशी होईल. या दिवसाला अविवाहित पंचमी श्राद्ध असेही म्हणतात.

15 सप्टेंबर, षष्ठीचे श्राद्ध- ज्या लोकांचा मृत्यू षष्ठी तिथीला झाला असेल, त्यांचे श्राद्ध षष्ठी तिथीला केले जाते.

16 सप्टेंबर, सप्तमीचे श्राद्ध - सप्तमी तिथीला मृत्यू झालेल्यांचे या दिवशी श्राद्ध होईल.

17 सप्टेंबर - या दिवशी श्राद्ध होणार नाही.

18 सप्टेंबर, अष्टमीचे श्राद्ध - अष्टमी तिथीला मृत्यू झालेल्यांचं श्राद्ध या दिवशी होईल.

19 सप्टेंबर, नवमीचे श्राद्ध- नवमी तिथीला विवाहित महिला आणि मातांचे श्राद्ध करणे उत्तम मानले जाते. म्हणूनच याला मातृनवमी श्राद्ध असेही म्हणतात.

20 सप्टेंबर, दशमीचे श्राद्ध- दशमीच्या दिवशी ज्या लोकांचा मृत्यू झाला असेल, त्यांचे श्राद्ध या दिवशी केले जाईल.

21 सप्टेंबर, एकादशीचे श्राद्ध- मृत तपस्वींचे श्राद्ध एकादशी तिथीला केले जाते.

22 सप्टेंबर, द्वादशीचे श्राद्ध- ज्या लोकांचा मृत्यू द्वादशीच्या दिवशी झाला असेल किंवा ज्यांची मृत्यू तारीख माहित नाही अशा लोकांचे श्राद्ध या दिवशी करता येते.

23 सप्टेंबर, त्रयोदशीचे श्राद्ध- त्रयोदशीला फक्त मृत मुलांवर अंत्यसंस्कार केले जातात.

24 सप्टेंबर, चतुर्दशीचे श्राद्ध- जे लोक अपघात, रोग किंवा आत्महत्येमुळे मरण पावतात, त्यांचे श्राद्ध चतुर्दशी तिथीला केले जाते. अकाली मरण पावलेल्या लोकांचे श्राद्ध या दिवशी केले जाते, मग त्यांचा मृत्यू कोणत्या तारखेला झाला याचा विचार केला जात नाही.

25 सप्टेंबर, अमावस्या श्राद्ध - सर्वपित्रि अमावस्या या दिवशी श्राद्ध-तर्पण अवश्य करा. या दिवशी तर्पण विधी केल्यानं पितरांचा आशीर्वाद मिळतो.  

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)