Raksha Bandhan 2022 Upay: रक्षाबंधनाच्या दिवशी करा हे उपाय, भावा बहिणीच्या आयुष्यात येईल सुख-समृद्धी !

Rakhi 2022 Upay: रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहिणी भावाला राखी बांधतात. भाऊ-बहिणीचे नाते प्रेम, विश्वास आणि आदराच्या धाग्याने जोडलेले असते. रक्षाबंधनाच्या दिवशी हे उपाय केले तर भावा बहिणीच्या आयुष्यात चांगली समृद्धी येईल.

Updated: Aug 11, 2022, 09:31 AM IST
Raksha Bandhan 2022 Upay: रक्षाबंधनाच्या दिवशी करा हे उपाय, भावा बहिणीच्या आयुष्यात येईल सुख-समृद्धी ! title=

मुंबई : Rakhi 2022 Upay: रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहिणी भावाला राखी बांधतात. भाऊ-बहिणीचे नाते प्रेम, विश्वास आणि आदराच्या धाग्याने जोडलेले असते. बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात, तर भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतात. असे असले तरी रक्षाबंधनाच्या दिवशी हे उपाय केले तर भावा बहिणीच्या आयुष्यात चांगली समृद्धी येईल.

रक्षाबंधनाला 200 वर्षानंतर दुर्मिळ योग

रक्षाबंधनाचा दिवस हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी शुभ मुहूर्तावर भावाच्या मनगटावर राखी बांधल्याने दोघांच्या जीवनात सुख-समृद्धी येते. या दिवशी केलेले काही उपाय खूप फलदायी ठरतात. ते भाऊ आणि बहिणीचे परस्पर प्रेम देखील वाढवतात आणि त्यांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी देखील वाढवतात.  

रक्षाबंधन 2022 साठी उपाय

ज्योतिष शास्त्रामध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी काही प्रभावी उपाय सांगण्यात आले आहेत. असे केल्याने जीवनातील नकारात्मक गोष्टी संपून सकारात्मकता येते. 

रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ-बहिणी मिळून गणपतीची पूजा करतात. असे केल्याने भाऊ-बहिणीच्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि चांगला काळ सुरु होतो. 

राखी बांधताना तुरटी पूजेच्या ताटात ठेवा आणि भावाला राखी बांधल्यानंतर बहीण ही तुरटी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने भावाच्या डोक्यावरुन फेका, असे केल्याने भावाच्या जीवनातील नकारात्मकता संपून शुभ घटना घडतात. 

रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधताना बहिणीला गुलाबी रंगाच्या कपड्यात तांदूळ, एक रुपया आणि सुपारी ठेवायला द्या. यानंतर बहिणीच्या चरणांना स्पर्श करून तिला तिच्या क्षमतेनुसार मिठाई, पैसे, कपडे इत्यादी द्या. त्यानंतर बहिणीकडून घेतलेली पुरचुंडी घरातील पवित्र ठिकाणी ठेवा. असे केल्याने जीवनात सुख-समृद्धी वाढते. नशीबाला चांगली साथ मिळते.

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतकांवर आणि माहितीवर आधारित आहे. 24TAAS त्याची पुष्टी करत नाही.)