Horoscope 2 September : 'या' राशीच्या व्यक्तींनी शेअर मार्केटमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक करावी

जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.

Updated: Sep 2, 2022, 07:06 AM IST
Horoscope 2 September : 'या' राशीच्या व्यक्तींनी शेअर मार्केटमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक करावी title=

मुंबई : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.

मेष

व्यापार-व्यवसायात आज विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. वडिलधाऱ्या मंडळींचा आदर करा. वेळेवर मित्र मदतीला धावून येतील.

वृषभ

आजच्या दिवशी नोकरीमध्ये उतार-चढाव जाणवतील. घरातील ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन मोलाचं ठरणार आहे. संध्याकाळी अनुकूल काळ आहे.

मिथुन

कौटुंबीक समस्या दूर होणार आहेत. नवी गाडी खरेदी करण्याचे योग आहेत. महत्त्वपूर्ण कार्यात यश मिळेल.

कर्क 

आजच्या दिवशी प्रकृतीत सुधारणा जाणवेल. नोकरीच्या ठिकाणी जबाबदारीने वागावं लागेल. कुटुंबात वाद होणार नाही, याची काळजी जरूर घ्या.

सिंह

रखडलेली काम दुपारनंतर होण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक करा. कुटुंबात मंगल कार्य होईल.

कन्या

व्यापारात यशस्वी होण्याचे योग आहेत. नवं घर खरेदी करू शकता. एखाद्या गरजू महिलेची मदत करू शकता.

तूळ

आजच्या दिवशी विवाह निश्चित होण्याचे योग आहेत. कोणत्याही कामात हलगर्जीपणा करू नका. महत्त्वाच्या गोष्टी कोणासोबतही शेअर करू नका.

वृश्चिक

मालमत्तेसंबंधित वाद संपुष्टात येण्याची शक्यता आहे. नोकरीत बदल करण्याचा विचार डोक्यात येईल. खर्चावर नियंत्रण ठेवा.

धनु

कामाचा ताण वाढेल. नातेसंबंधात मोठी दरी निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या. प्रवासाचे योग आहेत.

मकर

दुपारपर्यंत महत्त्वाची कामं टाळलेलीच बरी. उधारीत दिलेले पैसे परत मिळतील. 

कुंभ

मनातील इच्छा पूर्ण होण्याचे योग आहेत. मित्रांसोबत लांब प्रवासाला जाऊ शकतात. कुटुंबाला वेळ देऊ शकाल.

मीन

संपूर्ण दिवसभर आळस येईल. दुपारनंतर महत्त्वाची कामं करा. आज कोणालाही पैसे उधार देऊ नका.