30 वर्षांनंतर शनीचा कुंभ राशीत प्रवेश, 4 राशींवर होणार वाईट परिणाम

30 वर्षांनंतर शनीचा कुंभ राशीमध्ये प्रवेश होत आहे. त्यामुळे आता याचा परिणाम इतर राशींवर कसा होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Updated: Dec 8, 2021, 05:20 PM IST
30 वर्षांनंतर शनीचा कुंभ राशीत प्रवेश, 4 राशींवर होणार वाईट परिणाम

मुंबई: 30 वर्षांनंतर शनीचा कुंभ राशीमध्ये प्रवेश होत आहे. त्यामुळे आता याचा परिणाम इतर राशींवर कसा होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 12 राशींपैकी कोणत्या राशींसाठी शनीचा कुंभ प्रवेश वाईट ठरणार आणि कोणासाठी चांगला ठरणार जाणून घेऊया. 

शनी अडीच वर्षांनी आपली राशी बदलतो. 2022 मध्ये तो आपलं स्थान बदलणार आहे. तो कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. 30 वर्षांनंतर अखेर कुंभ राशीमध्ये शनी प्रवेश करणार आहे. याचा परिणाम कसा होणार आहे पाहा. 

कुंभ- आरोग्याच्या समस्या उद्भवणार आहेत. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. आर्थिक चणचण जाणवेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.  कुटुंबात कोणत्याही प्रकारच्या वादामुळे त्रास वाढेल. नोकरीत कामाच्या ठिकाणी खूप अडचणी येतील.

कर्क- कर्क राशीच्या व्यक्तींसाठी ही स्थिती चांगली असणार नाही. आर्थिक अडचणी वाढणार आहेत. नोकरी आणि व्यावसायात समस्यांचा सामना करावा लागणार आहेत. आर्थिक गुंतवणुकीबाबत काळजी घ्यावी लागेल. नवीन कामाच्या सुरुवातीला त्रास होईल.

तुळ- संपत्तीवरून घरात खूप वाद होतील. नोकरी आणि व्यवसायात समस्य़ांचा सामना करावा लागणार आहे. अडणींवर मात करणं गरजेचं आहे. 

वृश्चिक2022 मध्ये खूप कष्ट करावे लागणार आहेत. यश मिळवण्यासाठी आपल्याला सतत अधिक प्रयत्नशील राहावं लागणार आहे. नोकरीमध्ये मन लागणार नाही. मानसिक स्वास्थ उत्तम राहणार नाही. जोडीदारासोबत वाद होतील. 

वृषभ, कन्या आणि सिंह- 2022 मध्ये कुंभ, धनु, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक आणि मीन राशीवर खास परिणाम होणार आहे. तर वृभष, कन्या आणि सिंह राशीवर शनीचा कोणताही परिणाम होणार नाही असं सांगितलं जात आहे.