Sankashti Chaturthi 2024 : मंगळवारी आलीय अंगारकी संकष्टी चतुर्थी, तुमच्या शहरातील चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या

Angarki Sankashti 2024 : मंगळवारी 25 जूनला संकष्टी चतुर्थीचं व्रत करण्यात येणार आहे. ही संकष्टी मंगळवारी आल्यामुळे तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. 

नेहा चौधरी | Updated: Jun 24, 2024, 03:13 PM IST
Sankashti Chaturthi 2024 : मंगळवारी आलीय अंगारकी संकष्टी चतुर्थी, तुमच्या शहरातील चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या  title=
Sankashti Chaturthi 2024 June 25 shubh muhurat moon rise timing in mumbai thane pune maharashtra in your city

Angarki Sankashti 2024 : ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थीचं व्रत मंगळवारी 25 जूनला करण्यात येणार आहे. विघ्नहर्त्याला समर्पित संकष्टीचं व्रताला गणेश भक्तांमध्ये उत्साह असतो. दर महिन्याला संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं. चंद्राला अर्घ्य अर्पण करुनच संकष्टीचा उपवास सोडला जातो. (Sankashti Chaturthi 2024 June 25 shubh muhurat moon rise timing in mumbai thane pune maharashtra in your city)

अंगारक संकष्ट चतुर्थी शुभ मुहूर्त

पंचांगानुसार ज्येष्ठ कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 25 जूनला मध्यरात्री 1 वाजून 23 मिनिटांनी सुरु होणार असून 25 जूनला रात्री 11.10 वाजेपर्यंत असणार आहे. 

अंगारक संकष्ट चतुर्थी चंद्रोदय ही रात्री 10 वाजून 28 मिनिटांनी असणार आहे. 

अंगारक संकष्ट चतुर्थी पूजा-विधी

यादिवशी भगवान श्री गणेशाचा जलाभिषेक करुनगणरायाला पुष्प अर्पण करुन चंदन लावा.यानंतर मोदक आणि फळांचा नैवेद्य दाखवा. त्यानंतर संकष्ट चतुर्थीच्या कथेचं वाचन करुन मंत्रांचा जप करा. 

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी 'या' मंत्रांचा करा जप!

ओम गणपतेय नम:

श्री गणेशाय नम:

ओम वक्रतुंडा हुं:

वक्रतुंड महाकाय, सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरू मे देव, सर्वकार्येषु सर्वदा

हेसुद्धा वाचा - Ashadhi Ekadashi 2024 : भेटी लागी जीवा..! कधी आहे आषाढी एकादशी? तिथी, शुभ मुहूर्त, आणि महत्त्व जाणून घ्या

अंगारक संकष्ट चतुर्थीला तुमच्या शहरातील चंद्रोदयाची वेळ! 

शहराचं नाव  चंद्रोदयाची वेळ

मुंबई - 10.28

ठाणे - 10.28

पुणे  -     10.23

रत्नागिरी -    10.23

कोल्हापूर -   10.19

सातारा - 10.22

नाशिक - 10.26

अहमदनगर - 10.20

धुळे - 10.23

जळगाव - 10.20

वर्धा - 10.07

यवतमाळ - 10.16

बीड - 10.16

सांगली - 10.18

सावंतवाडी - 10.20

सोलापूर - 10.14

नागपूर - 10.05

अमरावती - 10.11

अकोला - 10.14

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - 10.19

भुसावळ -10.19

परभणी - 10.12

नांदेड - 10.09

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)