शनी आणि राहूचा धोकादायक योग! 5 राशीच्या लोकांवर 17 ऑक्टोबरपर्यंत कोसळणार संकट

Saturn and Rahu 2023 : शनिदेव राहूचा स्वामी असलेल्या शतभिषा नक्षत्रात पोहोचला आहे. इथे शनिदेव 17 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. त्यामुळे शनि आणि राहूचा संयोगाने 5 राशींच्या लोकांना सतर्क राहावं लागणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Oct 7, 2023, 04:58 PM IST
शनी आणि राहूचा धोकादायक योग! 5 राशीच्या लोकांवर 17 ऑक्टोबरपर्यंत कोसळणार संकट
saturn and rahu yuti shatabhisha nakshatra these 5 zodiac sign faces problems till 17 october

Shani-Rahu Yuti : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि आणि राहूला विशेष महत्त्व आहे. शनिदेव हा न्यायदेवता आहे. तर राहू हा मायावी सावलीचा ग्रह मानला जातो. शनिदेव व्यक्तीच्या कर्मानुसार त्याला शुभ आणि अशुभ फळ देतो. शनि आणि राहू हे दोन्ही अतिशय संथ गतीने आपली स्थिती बदलतात. शनिदेव हा अडीच वर्षांनी तर राहू 18 महिन्याने आपली रास बदलतात. शनिदेव सध्या कुंभ राशीत असून 15 मार्चपासून शनीने शतभिषा नक्षत्रात आहे. तर शतभिषा नक्षत्राचा स्वामी राहू असल्याने शनिदेव आणि राहुच्या युतीने खतरनाक योग तयार झाला आहे. येत्या 17 ऑक्टोबरपर्यंत 5 राशींच्या लोकांना सतर्क राहावं लागणार आहे. (saturn and rahu yuti shatabhisha nakshatra these 5 zodiac sign faces problems till 17 october)

Add Zee News as a Preferred Source

कर्क (Cancer Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी शतभिषा नक्षत्रात शनीचा प्रवेश अतिशय घातक आहे. या काळात जीवनात चढ-उतार पाहावे लागणार आहे. आर्थिक अडचणींमुळे मन अस्वस्थ असेल. त्यामुळे मानसिक स्थितीवरही खोलवर परिणाम होणार आहे. कुटुंबातील सदस्यांशी योग्य संवाद ठेवणे तुमच्या हिताचे होईल अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या काळात गुंतवणूक टाळा. 

कन्या (Virgo Zodiac) 

या राशीसाठी हा योग अत्यंत धोकादायक आहे. यावेळी, व्यक्तीला आर्थिक आणि मालमत्तेशी संबंधित निर्णयांबाबत विशेष सावध राहवं लागणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना शनीच्या प्रभावाखाली शिक्षणात अडचणी सहन कराव्या लागणार आहेत. कर्जाचा दबाव वाढणार आहे. 

वृश्चिक (Scorpio Zodiac)

शनि आणि राहूच्या संयोगामुळे या राशीच्या लोकांना वडिलोपार्जित मालमत्ता, आरोग्य आणि वैयक्तिक जीवनात अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे.  तुमच्या आर्थिक परिस्थितीचे निरीक्षण करणं गरजेचं आहे. नात्यात चढ-उतार पाहिला मिळेल. यासोबतच तुमच्या मान-सन्मानाच्या बाबतीतही समस्या निर्माण होणार आहे. प्रवासातही विशेष खबरदारी घ्यावी लागेल आहे, कारण अपघाताचा धोका आहे. 

कुंभ (Aquarius Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी हा काळ चढ-उतार आणि मानसिक तणावाने भरलेला असणार आहे. या काळात तुम्हाला कठीण निर्णय घ्यावे लागू शकतात. आरोग्याच्या समस्यांवर पैसे खर्च होणार आहे. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होणार आहे. जोडीदाराशी वाद होऊन नात्यात तणाव निर्माण होणार आहे. 

मीन (Pisces Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी शनि आणि राहूचा युती खूप वादग्रस्त ठरणार आहे. तुमच्या जोडीदाराशी संवाद साधण्यात तुम्हाला अडचणी येऊ शकतात. आपल्या सभोवतालच्या लोकांशी देखील काळजीपूर्वक वागावे. या काळात तुमच्या मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची शक्यता आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्या. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More