Saturn Moon 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा सर्वात जलद गतीने आपलं दोन बदलतो. सव्वा दोन दिवसात तो एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतो. तर न्यायदेवात शनी हा एका राशीत जवळपास अडीच वर्ष विराजमान असतो. सध्या शनिदेव स्वगृही म्हणजे कुंभ राशीत आहे. अशात चंद्र 30 ऑगस्टला कुंभ राशीत गोचर करणार आहे. अशा स्थितीत कुंभ राशीत शनी आणि चंद्राची भेट होणार असून यातून अतिशय घातक असा योग विष योग तयार होतो आहे. यामुळे तीन राशींचं आयुष्य भूकंप येणार आहे. (saturn is coming with moon problem for three zodiac signs be careful Shani Chandra Yuti Astrology news)
चंद्र 30 ऑगस्टला सकाळी 10.19 वाजता कुंभ राशीत प्रवेश करेल आणि 1 सप्टेंबरला सकाळी 9.36 पर्यंत तिथे असणार आहे. त्यानंतर चंद्र मीन राशीमध्ये गोचर करेल. शनि आणि चंद्राची युती ही कुंडलीतील सर्वात वाईट स्थिती 4थ्या, 8व्या आणि 12व्या घरात मानली जाते. कुंडली इतर कोणत्याही घरात असली तरी नकारात्मक प्रभाव दिसणार आहे. या योगामुळे मानसिक तणाव, निराशा, चिंता, नैराश्य यासारख्या समस्या जाचकाला होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि आणि चंद्र जवळ आले तर विष दोषाची शक्ती वाढतं असं म्हणतात.
या राशीच्या लोकांच्या कुंडलीत चंद्र तिसर्या घरात आणि शनि दहाव्या भावात आहे. त्यामुळे नोकरदार लोकांच्या अडचणीत वाढ होणार आहे. ऑफिसमध्ये तुमचं लोकांशी भांडण होण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत नोकरी धोक्यात येऊ शकते. तुमचा आत्मविश्वास ढासळणार आहे. नोकरी किंवा पदोन्नती मिळवणे कठीण जाईल.
कुंडलीतील चंद्र पहिल्या घराचा स्वामी आहे आणि शनि आठव्या भावात आहे. अशा स्थितीत तुमच्या आयुष्यात अचानक अनेक बदल होणार आहेत. वाहन चालवताना काळजी घ्या, कारण अचानक अपघात होण्याचे संकेत आहे. जीवनातही अनेक अडचणींचा सामना तुम्हाला करायचा आहे. मानसिक तणावातून तुम्ही जाणार आहात.
या राशीच्या कुंडलीत विष योग पहिला आणि सातव्या भावात राहणार आहे. त्यामुळे मानसिकदृष्ट्या तुम्हा अस्वस्थ असणार आहात. शारीरिक समस्या वाढणार आहे. काम वेळेत होणार नाही म्हणून तुमची चिडचिड होणार आहे. वैवाहिक जीवनात या योगाचा वाईट परिणाम दिसणार आहे. म्हणून या दिवसात नकारात्मक लोकांपासून आणि विचारांपासून दूर राहा. कोणत्याही प्रकारच्या वादापासून स्वतःला दूर ठेवा.