Shani-Budh Nakshtra Gochar 2023: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका निश्चित कालावधीमध्ये त्याच्या राशीत बदल करतो. यावेळी अनेक ग्रह गोचर आणि नक्षत्र बदलतात. यावेळी याचा सर्व राशींच्या जीवनावर परिणाम होतो. या काळात सर्व 12 राशींच्या जीवनावर शुभ आणि अशुभ परिणाम दिसून येतात. 15 ऑक्टोबर रोजी बुध आणि शनि या दोन्ही ग्रहांनी त्यांच्या नक्षत्रात बदल केला आहे. या काळात सर्व राशींच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येतील.
यावेळी शनीने धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश केला असून बुधाने चित्रा नक्षत्रात प्रवेश केला आहे. दरम्यान या दोन्ही ग्रहांच्या ग्रहांच्या नक्षत्र बदलाने काही राशींच्या आयुष्यात मोठा आणि चांगला बदल होणार आहे. ज्योतिषशास्त्रात बुध आणि शनी या दोघांनाही विशेष स्थान देण्यात आलंय. कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत शनि आणि बुध शुभ असल्यास त्या व्यक्तीला सौभाग्य प्राप्त होते. बुध आणि शनीच्या राशीत बदलामुळे वर्षाच्या शेवटी कोणत्या राशींची चांदी होणार आहे ते पाहुयात.
ज्योतिष शास्त्रानुसार, कर्क राशीच्या लोकांना शनी आणि बुधाच्या नक्षत्र बदलामुळे विशेष फायदा होणार आहे. या काळात तुम्हाला मानसिक शांती मिळेल. या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. यावेळी तुम्हाला तुमच्या पालकांचे सहकार्य मिळेल. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. मालमत्तेशी संबंधित कामात आर्थिक लाभ होईल. व्यवसाय आणि नोकरीमध्ये सकारात्मक आर्थिक लाभ मिळणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, यावेळी तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असणार आहात. या काळात व्यवसायात वाढ होणार आहे. कठोर परिश्रम करण्याची वेळ आली असून तुम्हाला अधिक मेहनत करावी लागणार आहे. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर तुम्हाला या काळात तुमच्या आईकडून पैसे मिळू शकतात. लाभाच्या संधी मिळतील. नोकरीच्या अनेक संधी मिळू शकतात.
शनी आणि बुध ग्रहांनी नक्षत्र बदलल्यामुळे मकर राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळतील. यावेळी, शैक्षणिक कार्यात आनंददायी परिणाम प्राप्त होतील. धार्मिक संगीतात व्यक्तीची आवड वाढेल. यावेळी तुम्हाला सन्मान मिळेल. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळात आधी केलेल्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. मालमत्तेशी संबंधित कामात आर्थिक लाभ होईल.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )