Shani Vakri: शनीची वक्री चाल ठरणार शुभ; 'या' राशींच्या व्यक्तींच्या घरी येणार पैसाच पैसा

Shani Vakri: नऊ ग्रहांपैकी शनिदेव हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. तो एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. अशा स्थितीत तो प्रत्येक राशीच्या लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. 

सुरभि जगदीश | Updated: Sep 1, 2023, 09:06 PM IST
Shani Vakri: शनीची वक्री चाल ठरणार शुभ; 'या' राशींच्या व्यक्तींच्या घरी येणार पैसाच पैसा title=

Shani Vakri: ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर आपल्या राशीमध्ये बदल करतात. दरम्यान नऊ ग्रहांपैकी शनिदेव हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. तो एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. अशा स्थितीत तो प्रत्येक राशीच्या लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. शनी सध्या स्वतःच्या राशीत कुंभ राशीत प्रतिगामी अवस्थेत आहे. या राशीत 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 8:26 वाजता मार्गी होणार आहे. 

मंद गतीने फिरणारा शनि प्रत्येक राशीच्या राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम करू शकतो. यावेळी शनि वक्री अवस्थेत भ्रमण करतोय. शनीची वक्री स्थिती काही लोकांच्या आयुष्यावर सकारात्मक तर काहींच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम करू शकते. यावेळी शनीची वक्री चाल कोणत्या राशीच्या व्यक्तींसाठी उपयुक्त ठरणार आहे, ते पाहुयात.

सिंह रास 

सिंह राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री गती लाभदायक ठरू शकणार आहे. अशा स्थितीत अचानक आर्थिक लाभासोबतच व्यवसायात मोठा व्यवहार होऊ शकतो. या काळात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतात.

वृश्चिक रास 

शनीच्या वक्री स्थितीमुळे 'या' राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळही मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुम्ही तुमच्या बोलण्याच्या बळावर अनेक कामं पार पाडाल. आर्थिक स्थितीही चांगली राहील. नोकरदार लोकांना या काळात करिअरच्या खूप चांगल्या संधी मिळणार आहेत. 

धनु रास 

या राशीसाठी शनीची वक्री चाल अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. अनेक क्षेत्रांत अनपेक्षित परिणाम दिसू शकतात. तुमची कोणतीही महत्त्वाची योजना यशस्वी झाल्यास तुम्ही आनंदी व्हाल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले परिणाम मिळतील. भाऊ-बहिणीमध्ये प्रेम वाढू शकते. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )