Sankashti Chaturthi 2023 : आज संकष्टीला Shanidev करु शकतील तुम्हाला श्रीमंत, 'या' राशींना मिळणार वरदान

Shanidev On Sankashti Chaturthi : आजचा दिवस खऱ्या अर्थाने खास आहे. भगवान शंकर आणि गणरायाची एकत्र पूजा करण्याचा वापर. आज संकष्टीला तुमच्यावर शनीदेवही प्रसन्न होणार आहे.

नेहा चौधरी | Updated: May 8, 2023, 07:37 AM IST
Sankashti Chaturthi 2023 : आज संकष्टीला Shanidev करु शकतील तुम्हाला श्रीमंत, 'या' राशींना मिळणार वरदान title=
Shani Blessing On Sankashti Chaturthi Shani Vakri 2023 Lucky Zodiac Signs Get Money Navpancham Rajyog

Navpancham Rajyog 2023 : एकंदत संकष्टी चतुर्थी (Ekdant Sankashti Chaturthi 2023), शिवयोग सोबत शनिदेवही (Shanidev) वक्री स्थितत आला आहे. त्यामुळे आजच्या दिवशी काही राशींवर गणरायासोबतच शनीदेवची (Shani Vakri 2023) कृपा बरसणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रहांचं एका ठराविक काळानंतर गोचर होतं असतं. हे ग्रह एखाद्या राशीत किंवा नक्षत्रात बदल करत असतात. अशात या ग्रह नक्षत्र आणि राशींमुळे काही विशेष योग तयार होतात. (Shanidev On Sankashti Chaturthi)

6 मे 2023 ला मिथून राशीत शुक्रचं गोचर झालं आहे. त्यात कुंभ राशीतून शनि वक्री स्थितीत आला आहे. अशात शनी आणि शुक्राच्या (Shani Shukra) युतीने नवपंचम राजयोग तयार झाला आहे. या योगामुळे आज संकष्टीला (Sankashti Chaturthi 2023) काही राशींवर पैशांचा पाऊस पडणार आहे.  (shani astrology news in marathi)

'या' राशींना होणार धनलाभ!

तूळ (Libra) 

शुक्र हा तूळ राशीचा स्वामी आहे त्यामुळे नवपंचम राययोगाचा या लोकांना सर्वाधिक फायदा होणार आहे. आजपासून तुमच्या आयुष्यात प्रगतीचे मार्ग सुरु होणार आहे. धार्मिक कार्यात तुमचं मनं रमणार आहे. एखादी पूजा तुमच्या हातून घडणार आहे. या राशीच्या कुंडलीत त्रिकोण राजयोगदेखील जुळून आला आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या आतापर्यंतच्या केलेल्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. पगार वाढ, प्रमोशन आणि नव्या जबाबदारी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. (Shani Blessing On Sankashti Chaturthi Shani Vakri 2023 Lucky Zodiac Signs Get Money Navpancham Rajyog)

कुंभ (Sagittarius)

कुंभ राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग अतिशय शुभ सिद्ध होणार आहे. आर्थिक प्रगतीपासून यशाचे अनेक शिखर तुम्ही गाठणार आहात. बुद्धीचा उपयोग सकारात्मक गोष्टीत लागल्यामुळे प्रगतीचे नवीन मार्ग गवसणार आहेत. जुन्या गुंतवणुकीतून मोठा आर्थिक फायदा होणार आहे. जर मालमत्ता खरेदी किंवा गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगला काळ सुरु आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचं आणि कामाचं कौतुक होणार आहे, ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

धनु (Aquarius)

धनु राशीच्या लोकांना नवपंचम राजयोग फलदायी ठरणार आहे. त्यांचं नशीब रातोरात पालटणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदापासून आर्थिक फायदा होणार आहे. या काळात शत्रूदेखील तुमचे मित्र होणार आहे. कामाच्या ठिकाणी महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार आहे. कामानिमित्त परदेशात जाण्याचे योग आहेत. आरोग्याची समस्या सुटणार आहे. 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)