Shani Dev : तुमच्या कुंडलीत शनी बलवान की कमजोर? हे संकेत मिळाल्यास करा उपाय

Shani Dev : जर कुंडलीत शनिदेव नकारात्मक आणि अशुभ असेल तर आपल्या आयुष्यातील गोष्टींवर त्याचा कसा परिणाम होतो. आपल्याला काय संकेत मिळतात? ज्योतिषशास्त्र पंडित काय सांगतात जाणून घ्या.     

नेहा चौधरी | Updated: Aug 10, 2023, 04:50 AM IST
Shani Dev : तुमच्या कुंडलीत शनी बलवान की कमजोर? हे संकेत मिळाल्यास करा उपाय  title=
shani kundali predictions saturns position how to know shani dosh upay

Shani Dev : शनी ग्रह म्हणजे शनीदेव...या ग्रहाची जाचकाला खूप भीती वाटते. कारण असं म्हणतात शनीदेव हा जाचकाला त्याचा कर्माची फळं देतो. शनीदेव हा कर्म दाता किंवा न्यायदेवता आहे, असं वैदिक ज्योतिषशास्त्रात म्हटलं गेलं आहे. तो जाचकाला त्याचा कर्माची फळं देतो. चांगल्या कर्मला चांगली तर वाईट कर्म करणाऱ्याला शिक्षा देतो. शनीदेवाची वक्रदृष्टी प्रकोपही श्रीमंत व्यक्तीला गरीब करण्याची ताकद ठेवतो. पण आपल्या कुंडलीतील शनिदेव हा मजबूत स्थितीत आहे की कमजोर हे आपल्याला कसं कळणार. याची काही लक्षणं आपल्या आयुष्यात दिसतात का? शिवाय कुंडलीतील शनिदेव मजबूत स्थिती आणण्यासाठी काही उपाय आहेत का? तर या सगळ्याचं उत्तर ज्योतिषशास्त्र पंडित आपल्याला सांगणार आहेत.  (shani kundali predictions saturns position how to know shani dosh upay)

कुंडलीत शनि बलवान असल्यास काय होते?

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि ग्रह बलवान असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक घटना घडतात. तूळ राशीसाठी शनीदेव सर्वाधिक प्रसन्न असतो. कारण तूळ राशीच्या लोकांच्या कुंडलीत शनिदेव बलवान स्थितीत असतो. या लोकांना शनिदेव हनती, कष्टाळू आणि न्यायी बनवतो. त्यामुळे ही लोक करिअरमध्ये प्रगती आणि यशाची पायरी चढतात. 

सकारात्मक परिणाम मिळतात. तूळ राशीमध्ये शनीला श्रेष्ठ मानले जाते. येथे शनी श्रेष्ठ असणे म्हणजे बलवान असणे. हे स्थानिकांना मेहनती, कष्टाळू आणि न्यायी बनवते. यासोबतच त्याच्या प्रभावामुळे व्यक्तीला कामाच्या ठिकाणी यश मिळते. त्यामुळे माणसाला रुग्णही होतो.  कुंडलीत शनिदेव उच्च किंवा लग्न घरात असेल तर त्या व्यक्तीचं आरोग्य उत्तम असतं. कारण शनिदेव हा न्यायदेव तर आहेच शिवाय तो आयु प्रदाता पण आहे. 

शनि ग्रह अशुभ स्थितीत असेल तर ?

दुसरीकडे, पीडित शनि देवाची तो व्यक्तीला अनेक अडचणीत टाकतो. जेव्हा मंगळ शनीदेवाला त्रास देतो तेव्हा त्या व्यक्तीचा अपघात किंवा त्याला जेलची हवा खावी लागते. याउलट जर एखाद्याच्या कुंडलीत शनिदेव अशुभ असेल तर त्या व्यक्तीला नशिबाची साथ मिळत नाही आणि आयुष्यभर सतत त्रास सहन करावा लागतो, असं ज्योतिषशास्त्र पंडित सांगतात. 

शनि बलवान की कमकुवत ही आहेत लक्षणं

जेव्हा तुम्हाला बहुतेक एकटं आणि दुःखी वाटत असेल, तेव्हा समजून घ्या की तुमच्या कुंडलीत शनिदेव हा कमकुवत स्थितीत आहे.
जर तुम्हाला सतत आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल तर समजा तुमच्या कुंडलीत शनि कमजोर आहे.
मेहनत करूनही यश मिळत नसेल तर याचं कारण शनिची कमकुवत स्थिती आहे.
ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शनी अशक्त असतो तेव्हा त्या व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होतो.

शनि उपाय (Shani Upay) 

शनि ग्रहाला बलवान बनवण्यासाठी शनिवारी गरिबांना अन्न, पेय किंवा कपडे दान केले पाहिजे.
शनिवारी संध्याकाळी शनिदेवाच्या मंदिरात मोहरी किंवा तिळाच्या तेलात तीळ टाकून दिवा लावा. 
भगवान शंकर हे शनिदेवाचे गुरु आहेत, म्हणून शनिवारी एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात एक फूल टाकून, गंगा जल आणि काही काळे तीळ टाकून शिवाला जल अर्पण करा. 
शनिवारी एका भांड्यात मोहरीचं तेल टाका, त्यात तुमचा चेहरा पहा आणि नंतर ते तेल दान करा. याला सावली दान असं म्हटलं जातं.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)