Shani Gochar : 10 फेब्रुवारीपासून 'या' राशींच्या आयुष्यात शनि करणार तांडव! सावध न राहिल्यास होईल मोठं नुकसान

Shani Nakshtra Parivartan : फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यात येत्या 10 फेब्रुवारीला शनिदेव नक्षत्र परिर्वतन करणार आहे. शनिदेवाच्या नक्षत्र परिर्वतनामुळे काही राशींना फायदा होणार आहे. मात्र काही राशींच्या लोकांना सतर्क राहावं लागणार आहे.

नेहा चौधरी | Updated: Feb 3, 2024, 09:00 AM IST
Shani Gochar : 10 फेब्रुवारीपासून 'या' राशींच्या आयुष्यात शनि करणार तांडव! सावध न राहिल्यास होईल मोठं नुकसान title=
Shani Nakshtra Parivartan February 10 Shani will make a fuss in the lives of these zodiac signs If you are not careful you will lose a lot

Shani Nakshtra Parivartan : वैदिक ज्योतिशशास्त्रात शनिदेव हा सर्वात क्रूर ग्रह मानला जातो. असं म्हणतात की, जेव्हा आपले कर्म चांगले असतात तेव्हा शनिदेव आपल्यावर प्रसन्न असतात. मात्र आपले कर्म खराब असतील तेव्हा शनिदेवाच्या क्रोधाचा सामना करावा लागतो. न्याय आणि कर्माचा दाता शनिदेव येत्या 10 फेब्रुवारीला नक्षत्र संक्रमण करणार आहे. पुढील शनिवारी दुपारी 2 वाजता शतभिषा नक्षत्राच्या तृतीय स्थानात प्रवेश करणार आहे. शनि नक्षत्र काही राशींसाठी शुभ तर काही राशींसाठी अशुभ ठरणार आहे. (Shani Nakshtra Parivartan February 10 Shani will make a fuss in the lives of these zodiac signs If you are not careful you will lose a lot)

कर्क रास (Cancer Zodiac)   

या राशीच्या लोकांच्या जीवनावर शनीच्या रास बदलाचा प्रभाव जाणवणार आहे. या काळात तुमती कामं बिघडणार आहेत. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना त्यांच्या कामाशी प्रामाणिक राहावं लागणार आहे, नाहीतर ते अडचणीत सापडतील. त्याचबरोबर जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी शनीच्या राशीतील बदल त्यांच्यावर वाईट परिणाम दिसून येणार आहे. व्यवसायिकांना काही नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. 

तूळ रास (Libra Zodiac)  

या राशीच्या लोकांसाठी शनीचा बदल खूप त्रासदायक ठरणार आहे. त्याच वेळी  शनीच्या नक्षत्रात बदल झाल्यामुळे, व्यक्तीच्या आरोग्यामध्ये काही समस्या जाणवणार आहेत. या व्यक्तींना मानसिक तणावाचा सामना करावा लागणार आहे. या काळात तुम्ही तुमचं मन शांत ठेवणं गरजेच आहे, अन्यथा मानसिक तणावात वाढ होण्याची भीती आहे.

वृषभ रास (Taurus Zodiac) 

शनीचा रास बदल या राशीच्या लोकांसाठी अशुभ ठरणार आहे. अशा परिस्थितीत या लोकांना करिअरशी संबंधित गोष्टींमध्ये सतर्क राहावं लागणरा आहे. संक्रमणादरम्यान, व्यक्तीला व्यवसायात फटका बसणार आहे. त्यामुळे या लोकांना अतिशय सावध राहावं लागणार आहे. व्यक्तीला त्याच्या मित्रांसोबत विशेष सावध राहणं गरजेच आहे. अन्यथा तुमची कोणत्याही प्रकारची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x