आज आषाढातील शनिप्रदोष व्रत - शिवरात्री! दुहेरी संयोगात साडेसाती - धैय्यासाठी राशीनुसार दान करा 'या' गोष्टी

Shani Pradosh Vrat 2023 : आजचा शनिवार अतिशय खास आहे. आज आषाढ महिन्यातील शनिप्रदोष व्रत आणि शिवरात्री असा दुहेरी योग जुळून आला आहे. त्यामुळे शनीची साडेसाती आणि धैय्यामुळे त्रस्त जाचकांनी आजची सुवर्ण संधी गमवू नका.  

नेहा चौधरी | Updated: Jul 15, 2023, 08:24 AM IST
आज आषाढातील शनिप्रदोष व्रत - शिवरात्री! दुहेरी संयोगात साडेसाती - धैय्यासाठी राशीनुसार दान करा 'या' गोष्टी title=
shani pradosh vrat shani dev shani shadhesati and shani dhaiya donate according to zodiac sign and Sawan Shivratri 2023

Shani Pradosh Vrat 2023 :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आजचा शनिवार अतिशय शुभ आहे. आज आषाढ महिन्यातील प्रदोष व्रत आहे. त्यात ते शनिवारी आल्यामुळे शनी प्रदोश व्रत आहे. सोबतच आज भोलेनाथाची विशेष कृपा मिळवण्याची संधी आहे. आज महिन्यातील शिवरात्रीदेखील आहे. त्यासोबत पंचांगानुसार आज त्रयोदशी तिथी आहे. 

हा अतिशय शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे ज्या जाचकांवर शनी साडेसाती आणि धैय्याचा त्रास सहन करावा लागतोय त्यांच्यासाठी आजचा सुवर्ण दिवस आहे. त्यामुळ शनीदेवासोबत भोलेनाथाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आज राशीनुसार दान करा. सुख समृद्धीसोबतच दुःखापासूनही मुक्ती मिळेल. (shani pradosh vrat shani dev shani shadhesati and shani dhaiya donate according to zodiac sign and Sawan Shivratri 2023)

मेष : या राशीच्या जाचकांनी छत्रीचं दान करावं. 

वृषभ : या राशीच्या लोकांनी काळ्या वस्त्रांचं दान करावं 

मिथुन : या राशीच्या लोकांसाठी मोहरीचं तेल दान करावं 

कर्क : या राशीच्या लोकांनी गरजू लोकांना वस्त्र दान करावं. 

सिंह : या राशीच्या लोकांनी अन्न आणि वस्त्र दान करणं शुभ मानलं जातं. 

कन्या : या राशीच्या लोकांसाठी ब्लँकेट आणि काळी छत्री दान करावी. 

तूळ : या राशीच्या लोकांसाठी मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल दान करावं. 

 

हेसुद्धा वाचा - Adhik Maas 2023 : अधिक मासात जावयाला का असतं एवढं महत्त्व? 'या' एका वस्तूने मुलीचं आयुष्य होईल सुखी

 

वृश्चिक : या राशीच्या लोकांसाठी लोखंडी भांडी किंवा काळे वस्त्र दान करणे शुभ मानले जाते. 

धनु : या राशीच्या लोकांसाठी काळी छत्री किंवा चामड्याचे जोडे दान करा. 

मकर : या राशीच्या लोकांनी गरजू लोकांना काळ्या डाळी, काळे तीळ किंवा कपडे दान करणे शुभ मानले जाते. 

कुंभ : या राशीची साडेसाती सुरु असल्याने यांनी शनिदेवाची पूजा नियमानुसार करावी. डाळ आणि काळे तीळ दान करणे शुभ मानले जाते. 

मीन : या राशीच्या लोकांना पांढरे वस्त्र आणि पांढरे फूल दान करावेत. 

 

हेसुद्धा वाचा - शनी वक्रीमुळे नोव्हेंबरपर्यंत 3 राशींना अमाप पैसे कमावून करोडपती होण्याचा योग

  
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)