Shani Vakri: शनी कुंभ राशीत होणार वक्री; 'या' राशीच्या लोकांसाठी सुवर्ण संधी

Shani Dev Vakri In Kumbh: शनीच्या वक्री चालीमुळे 2025 पर्यंत या राशीच्या संपत्तीत प्रचंड वाढ होऊ शकते. त्याचप्रमाणे काही राशींच्या आयुष्यात, करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते.

सुरभि जगदीश | Updated: Jun 20, 2024, 03:05 PM IST
Shani Vakri: शनी कुंभ राशीत होणार वक्री; 'या' राशीच्या लोकांसाठी सुवर्ण संधी title=

Shani Dev Vakri In Kumbh: प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह हा शनी आहे. शनी देव राशी परिवर्तनासह वक्री आणि मार्ग्रस्थ देखील होतात. यावेळी शनिदेवाला न्याय देणारा आणि परिणाम देणारा मानला जातो. शनिदेव 29 जून रोजी कुंभ राशीच्या मूळ त्रिकोणी राशीत वक्री चाल चालणार आहेत.

शनीच्या वक्री चालीमुळे 2025 पर्यंत या राशीच्या संपत्तीत प्रचंड वाढ होऊ शकते. त्याचप्रमाणे काही राशींच्या आयुष्यात, करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. चला जाणून शनी वक्रीमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे. 

वृष रास (Taurus Zodiac)

शनिदेवाची प्रतिगामी गती तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरीत नवीन संधी मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये काही प्रोजेक्टद्वारे यश आणि प्रसिद्धी मिळेल. यावेळी तुमचे तुमच्या वडिलांसोबतचे नाते अधिक घट्ट होणार आहे. या काळात तुम्हाला व्यवसायात मोठे यश मिळू शकते. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवनही उत्तम असणार आहे. 

मेष रास (Aries Zodiac)

मेष राशीच्या लोकांसाठी शनिदेवाची प्रतिगामी गती शुभ ठरू शकते. उत्पन्न आणि लाभाच्या ठिकाणी शनिदेव प्रतिगामी होणार आहेत. तुम्हाला तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ दिसू शकते. करिअरच्या प्रगतीसाठी चांगल्या संधी मिळतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील तयार होणार आहेत. तुमचं कुटुंब आणि जोडीदाराशी तुमचे संबंध पूर्वीपेक्षा चांगले होणार आहेत. तसेच यावेळी गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. 

मकर रास (Makar Zodiac)

शनिदेवाची वक्री हालचाल तुमच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. धन आणि वाणीच्या घरावर शनिदेव तुमच्या राशीत वक्री होणार आहेत. हा काळ तुमच्या करिअरमध्ये प्रगती आणणारा आहे. वेतनवाढ आणि पदोन्नती मिळू शकते. व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळतील. तुम्ही सर्व प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम असाल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना या काळात पदोन्नतीशी संबंधित चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )