Shardiya Navratri 3rd Day 2023 : शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस हा माता शक्तीच्या तिसरं रुप म्हणजे माता चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. घटस्थापनची तिसरी माळही चंद्रघंटा देवीला समर्पित असते. तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केल्याने धैर्यवान आणि शूर बनवण्याचे वरदान देते असं म्हणतात. माता चंद्रघंटाची पूजा पद्धत, आवडता नैवेद्य, शुभ मुहूर्त आणि मंत्र जाणून घेऊया. (shardiya navratri 2023 day 3 maa chadraghanta aarti puja vidhi bhog mantra and navratri day 3 colors tuesday)
मंगळवार लाल रंग असणार आहे. तर निळी फुले, गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळ फुलांच्या माळ.
चंद्रघंटा देवीच्या ललाटावर चंद्र शोभायमान असल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरुपाला चंद्रघंटा असं म्हटलं जातं. दुर्गा देवीचे चंद्रघंटा स्वरुप कल्याणकारी असतं. तर चंद्रघंटा देवीला दशभुजा असून गळ्यात पांढऱ्या फुलांची एक माळ असते.
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर सूर्याला अर्घ्य अर्पण करा. यानंतर व्रताचा संकल्प करून पूजा करा. चंद्रघंटा देवीचे पूजन करताना पिवळ्या किंवा सोनेरी रंगाची वस्त्रे परिधान करा. तसंच चंद्रघंटा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवा. यामध्ये खीर, बर्फीचा आवर्जुन ठेवा. याशिवाय देवीला मध अर्पण करा.
"पिण्डजप्रवरारूढ़ा ण्डकोपास्त्रकेर्युता।
प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्टेति विश्रुता॥
या देवी सर्वभूतेषु मां चंद्रघंटा रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमो नम:।।"
किंवा
ऐं श्रीं शक्तयै नम:
नवरात्रीच्या तिसर्या दिवशी माँ चंद्रघंटासमोर एका छोट्या लाल कपड्यात लवंग, सुपारी आणि पान ठेवून ते चंद्रघंटाच्या चरणी अर्पण करा. यानंतर देवाच्या नवार्ण मंत्राचा 108 वेळा जप करा. त्याशिवाय तुम्ही चंद्रघंटाच्या बीज मंत्राचाही जप करु शकता. हा लाल बंडल तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवतात तिथे ठेवा. जेव्हा तुम्ही कोणत्याही शुभ कार्यासाठी निघाल किंवा न्यायालयाशी संबंधित कोणतेही काम तेव्हा हे बंड जवळ ठेवा. या उपायामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि शत्रूची प्रत्येक चाल अपयशी ठरण्यास मदत होते.
नवरात्रि के तीसरे दिन चंद्रघंटा का ध्यान।
मस्तक पर है अर्ध चंद्र, मंद मंद मुस्कान।।
दस हाथों में अस्त्र शस्त्र रखे खडग संग बांद।
घंटे के शब्द से हरती दुष्ट के प्राण।।
सिंह वाहिनी दुर्गा का चमके स्वर्ण शरीर।
करती विपदा शांति हरे भक्त की पीर।।
मधुर वाणी को बोल कर सबको देती ज्ञान।
भव सागर में फंसा हूं मैं, करो मेरा कल्याण।।
नवरात्रों की मां, कृपा कर दो मां।
जय मां चंद्रघंटा, जय मां चंद्रघंटा।।
भूतलावर धर्माचे रक्षण आणि अंधःकार दूर करण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रकट झाली, अशी आख्यायिका आहे. या देवीची उपासना, आराधना केल्यास आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होते असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. यासह तिसऱ्या दिवशी केलेल्या दुर्गा सप्तशती पठणामुळे उपासकांना यश, प्रगती, कीर्ती, मान, सन्मान प्राप्त होतं, असं शास्त्रात सांगितलं आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)