Rajyog: बुध आणि शुक्राच्या युतीमुळे डबल राजयोग! या तीन राशींना मिळणार लाभ

ज्योतिषशास्त्रातील ग्रह मांडणीनुसार प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी बदल करत असतो. त्यामुळे ग्रहांचं 12 राशींमध्ये भ्रमण होत असतं. 

Updated: Jul 20, 2022, 12:17 PM IST
Rajyog: बुध आणि शुक्राच्या युतीमुळे डबल राजयोग! या तीन राशींना मिळणार लाभ title=

Astrology July 2022: ज्योतिषशास्त्रातील ग्रह मांडणीनुसार प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी बदल करत असतो. त्यामुळे ग्रहांचं 12 राशींमध्ये भ्रमण होत असतं. कधी कधी एकापेक्षा जास्त ग्रह एका राशीत येतात. ग्रहांच्या या युतीमुळे काही योग तयार होतात. 13 जुलै रोजी शुक्र ग्रहाने मिथुन राशीत प्रवेश केला आहे. या राशीत आधीपासूनच बुध ग्रह विराजमान आहे. हे दोन ग्रह एकाच राशीत एकत्र आल्याने महाराजयोग तयार झाला आहे. याचा प्रभाव सर्व 12 राशींवर होणार आहे, पण तीन राशींना या महायोगाचा विशेष लाभ मिळेल. तीन राशींच्या गोचर कुंडलीत डबल राजयोग तयार होत आहे. 

मिथुन - ज्योतिष शास्त्रानुसार या राशीतच महाराज योग तयार होत असल्याने या राशीच्या लोकांसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. गोचर कुंडलीत 2 राजयोग तयार होत आहेत. बुध स्वतःच्या राशीत असल्यामुळे भद्रा नावाचा राजयोग तयार होत आहे. त्याचबरोबर शुक्र ग्रहासोबत असल्यामुळे मध्य त्रिकोण राजयोग देखील तयार होत आहे. या दुहेरी राजयोगाने भौतिक सुखांची प्राप्ती होईल. त्याचबरोबर दशम स्थानात गुरु असल्यामुळे हंस नावाचा राजयोग तयार होत आहे. या काळात व्यवसायात चांगला फायदा होईल. भाग्य तुम्हाला साथ देईल. या काळात नवीन नोकरीची ऑफर येण्याची शक्यता आहे. जर तुम्ही आधीच कुठेतरी नोकरी करत असाल तर प्रमोशन होऊ शकते.

कन्या - या राशीसाठीही हा राजयोग शुभ सिद्ध होईल. या राशीच्या गोचर कुंडलीतही बुध ग्रह भद्रा नावाचा राजयोग निर्माण करत आहे. हा योग व्यवसायात लाभ देईल. यासोबतच बुधादित्य योगही तयार होतो, त्यामुळे नोकरदारांना कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळू शकतो.  नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. 

मकर - या राशीच्या लोकांच्या गोचर कुंडलीत दोन राजयोग तयार होत आहेत. यामध्ये रुचक आणि शश नावाचा राजयोग तयार होत आहे. हे दोन्ही राजयोग अचानक आर्थिक लाभ देतील. काही नवीन काम करायचे असेल तर हा काळ अनुकूल आहे. जर तुम्हाला व्यवसायात काही पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही करू शकता. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा. कारण राशीवर साडेसाती सुरु आहे. 

 (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)