Sleeping Position : 'या' पोझिशनमध्ये बेडवर झोपणारे लोक खुप भाग्यवान असतात, जाणून घ्या

तुम्ही 'या' अवस्थेत झोपता का? तुमची झोपायची स्थिती तुमच्याबद्दल खुप काही सांगून जाते

Updated: Nov 5, 2022, 11:16 PM IST
Sleeping Position : 'या' पोझिशनमध्ये बेडवर झोपणारे लोक खुप भाग्यवान असतात, जाणून घ्या  title=

मुंबई : झोपायच्या प्रत्येकाच्या (Sleeping Position) वेगवेगळ्या पद्धती असतात.काही लोक एका बाजूला कूस धरून झोपतात. तर काही लोकांना बेडवर पसरून झोपायची सवय असते.तसेच झोपलेल्या व्यक्तीकडे पाहून त्याची आंतरिक स्थिती समजू शकते. तसेच, त्याची सध्याची वेळ कशी आहे हे देखील जाणून घेऊ शकता. याच्या मदतीने व्यक्तीच्या राशीचा अचूक अंदाजही लावता येतो. आज आम्‍ही तुम्‍हाला झोपण्‍याची पद्धत तुमच्‍या वागण्‍याबद्दल आणि भविष्याविषयी काय सांगते, हे सांगणार आहोत. 

झोपताना कुस बदलणारे 

झोपताना (Sleeping) तुम्ही कुस बदललीत, तर तुम्ही शनि किंवा शुक्राचे वर्चस्व असल्याचे सांगतात. असे लोक नेहमी गोष्टी मनात साठवून ठेवतात. ते त्यांचे रहस्य इतरांसोबत कधीही शेअर करत नाहीत. आयुष्यात कितीही वाईट दिवस बघावे लागले तरी ही माणसे कधीच कोणाशी आपले मनातल सांगत नाही. मात्र, त्यांना नाव, संपत्ती आणि प्रसिद्धी मिळते.

बेडवर पसरून झोपणे 

ज्योतिषांच्या मते, ज्या लोकांना बेडवरून पसरून झोपायला आवडते त्यांच्यावर मंगळ किंवा सूर्याचा प्रभाव असतो. अशा लोकांना आयुष्यात काहीतरी मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो, म्हणून ते जबरदस्तीने गोष्टी मिळवण्याची आकांक्षा बाळगतात. त्यांच्या बोलण्यावर नियंत्रण नाही. अशा लोकांना खूप राग येतो. 

सपाट झोपणे

तुमच्यावर सूर्य आणि शनीचा संमिश्र प्रभाव असल्याचे सांगतात. असे लोक नियम आणि शिस्तीच्या बाबतीत खूप कडक असतात. हे लोक योग्य वेळी गोष्टी शोधून प्रगती करतात. मात्र, त्यांचे कौटुंबिक जीवन चांगले नाही. त्यांनी आपत्कालीन आरोग्य समस्यांकडे लक्ष दिले पाहिजे.

खुप जास्त झोपणारे 

असे लोक पूर्णपणे शुक्राचे वर्चस्व असलेल्या व्यक्ती असतात. सहसा वाईट किंवा चांगले काहीही त्यांच्यावर दीर्घकाळ परिणाम करत नाही. परिणाम काहीही असो, हे लोक आपापल्या परीने आयुष्य जगतात. भाग्य आणि प्रसिद्धी नेहमीच त्यांच्यासोबत असते. त्यांना आयुष्यात खूप पैसा मिळतो. तथापि, काही काळानंतर लोक त्यांना एकटे सोडतात.